ही मुलगी ११ व्या वर्षी आहे कोट्यधीश, १५ व्या वर्षी होणार निवृत्त!

266
ही मुलगी ११ व्या वर्षी आहे कोट्यधीश, १५ व्या वर्षी होणार निवृत्त!
ही मुलगी ११ व्या वर्षी आहे कोट्यधीश, १५ व्या वर्षी होणार निवृत्त!

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे खरं आहे. एक लहानशी अकरा वर्षांची मुलगी खरोखरच कोट्याधीश आहे. या वयात तसं पाहता मुलं हिंडणे, फिरणे, खेळणे, चांगले कपडे घालणे, चांगला खाऊ खाणे अशीच स्वप्न पाहतात. पण ही मुलगी इतर मुलांसारखी अजिबात नाहीय. तीही या सर्व गोष्टी करते, पण स्वकमाईने. एवढेच नव्हे तर ती एक रॉयल आयुष्य जगत आहे.

या मुलीचं नाव पिक्सी कर्टीस आहे. तिचा स्वतःची ‘पिक्सी फिडगेट्स’ नावाची कंपनी आहे. ही कंपनी लहान मुलांचे कपडे, खेळणी आणि इतर गोष्टी विकते. तसेच पिक्सी ही एक चाईल्ड इंफ्ल्यूएंसर आहे. पिक्सीचा सोशल मीडिया अकाऊंट तिची आई रॉक्सी सांभाळते. द सॅनच्या रिपोर्टनुसार, पिक्सीकडे असलेल्या मालमत्तेची किंमत बाहत्तर कोटींपेक्षा जास्त आहे. पिक्सीकडे मर्सिडीज बेन्झ सारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत. तिची लाइफस्टाईल इतर मुलांपेक्षा खूप वेगळी आहे. पिक्सी सुट्ट्यांमध्ये आपल्या प्रायव्हेट जेट मधून युरोपची सफर करते. एवढेच नव्हे तर मोठया माणसांप्रमाणे ती आपली त्वचा चांगली दिसण्यासाठी ट्रीटमेंटसुद्धा घेते. असं म्हटलं जातंय की, पिक्सी वयाच्या पंधराव्या वर्षी रिटायरमेंट घेणार आहे.

(हेही वाचा – ‘हप्ता नही दिया तो काट डालुंगा’; ‘डब्बा बाटली गँग’ची सांताक्रूझमध्ये दहशत)

इंस्टाग्रामवर पिक्सीचे एक लाख छत्तीस हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. यांपैकी कित्येक लोक पिक्सीच्या या लाईफस्टाईल विषयी तिच्यावर टीका करतात. लोकांचे असे म्हणणे आहे की, लहान मुलांनी त्यांच्याप्रमाणेच राहिले पाहिजे. लक्झरी लाईफस्टाईल तर ठीक आहे पण स्किन ट्रीटमेंट वैगरे जरा जास्तच होतंय. तर काहीजण असंही म्हणतात की, मोठी झाल्यावर या मुलीला सतत डॉक्टरांची गरज लागेल. या वयात एवढी ट्रीटमेंट घेतेय तर भविष्यात तिला त्वचेचे विकार होण्याची शक्यता आहे. पिक्सीची आई मात्र या सगळ्या गोष्टींकडे अगदी दुर्लक्ष करतेय. तिचं असं म्हणणं आहे की, माझी मुलगी तिला हवं तसं जगतेय आणि यापुढेही सगळं तसंच सुरू राहील. कोणी काहीही बोलले तरी आम्हाला फरक पडत नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.