Sangli LS Constituency : काँग्रेसने सांगलीत शिवसेना उबाठाचा उठवला बाजार

लोकसभा निवडणुकीत सांगली मतदार संघात काँग्रेसने शिवसेना उबाठाचा बाजार उठवला, असा तक्रारीचा सूर स्थानिक पातळीवर ऐकू येत असल्याचे सांगण्यात आले.

146
Sangli LS Constituency : काँग्रेसने सांगलीत शिवसेना उबाठाचा उठवला बाजार

लोकसभा निवडणुकीत सांगली मतदार संघात काँग्रेसने शिवसेना उबाठाचा बाजार उठवला, असा तक्रारीचा सूर स्थानिक पातळीवर ऐकू येत असल्याचे सांगण्यात आले. (Sangli LS Constituency)

उबाठाकडून परस्पर उमेदवारी

सांगली मतदार संघात शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना सांगलीत जाऊन परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली. यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. (Sangli LS Constituency)

काँग्रेसचा विशाल पाटलांसाठी आग्रह

काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. शिवसेना उबाठाने मात्र चंद्रहार यांच्या उमेदवारीचा हट्ट सोडला नाही. अखेर कदम यांनी थेट दिल्ली गाठत काँग्रेस हाय कमांडकडे विशाल पाटील याच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला. पण काँग्रेसने उबाठाशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला. (Sangli LS Constituency)

(हेही वाचा – प्रचारासाठी राहुल गांधींपेक्षा उद्धव ठाकरे बरे; Congress कडून सभांची मागणी)

काँग्रेसची बंडखोरी

काँग्रेस हाय कमांडचे न ऐकता विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेयवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने मात्र त्यांच्यावर कोणतीही शिस्तभांगाची कारवाई केली नाही. मंगळवारी ७ मे ला या मतदार संघात मतदान झाले आणि शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध तुटला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे काँग्रेसबाबत तक्रार केली. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी नव्हे तर विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने काम केले. राज्य पातळीवरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचादेखील विशाल पाटील यांना पाठींबा होता आणि त्यांनी विशाल पाटील यांचा प्रचार केला, अशी तक्रार शिवसेना उबाठाकडून करण्यात येत आहे. (Sangli LS Constituency)

यासंदर्भात शिवसेना उबाठाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. (Sangli LS Constituency)

सर्वाधिक मतदान सुमन पाटलांच्या क्षेत्रात

सांगली लोकसभा मतदार संघात ६२.२७ टक्के मतदान झाले आहे. या मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र असून सर्वाधिक ६६.०८ टक्के मतदान झाले ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील प्रतिनिधित्व करीत असलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्रात तर सगळ्यात कमी ५८.९३ टक्के खानापूर मतदार संघात. विशाल पाटलांचे समर्थक काँग्रेस आमदार विश्वजित पाटील यांच्या पलूस-कडेगावमध्ये ६२.३५ टक्के मतदारांनी मतदान केले तर भाजपाच्या सुधीर गाडगीळ यांच्या सांगली मतदार संघात ६०.९७ टक्के मतदान झाले. भाजपाचे आमदार सुरेश खाडे यांच्या मतदार संघात ६४.७९ टक्के आणि काँग्रेसच्या विक्रमसिंह सावंत यांच्या जत क्षेत्रात ६०.७६ टक्के नागरिकांनी मतदानात भाग घेतला. (Sangli LS Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.