Fraud : बँकेकडे गहाण असलेले विमान विकले, नेदरलँडस्थित कंपनीची फसवणूक

116
Fraud : निवृत्तीवेतनधारकांनो 'या' फसवणुकीपासून व्हा सावध; लेखा व कोषागारे संचालनालयाचे आवाहन

बँकेकडे गहाण असलेल्या विमानाची विक्री करून नेदरलँडस्थित व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी एका खाजगी विमान कंपनीच्या संचालकासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सुप्रीम ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि सीईओ अमित अग्रवाल यांना अटक केली आहे. अमित अग्रवाल हे अंधेरी जे.बी. नगर येथे राहणारे आहेत. (Fraud)

आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेदरलँड येथील ट्रेक एअर बीव्हीचे मालक मिशिल नीफेल यांची कंपनी विमान खरेदी विक्री करते. अग्रवाल यांनी त्याचे खराब झालेले सेसना २०८B छोटे विमान विकणार असल्याचे कळताच नीफेल हे अग्रवालच्या संपर्कात आले होते. नीफेल आणि अग्रवाल यांच्यात जुलै २०२२ मध्ये विमान खरेदी करण्यासाठी दोघांमध्ये एक करार करण्यात आला. त्यानंतर अग्रवाल यांच्या सूचनेनुसार नीफेल यांनी ४ कोटी ५६ लाख अग्रवाल कंपनीच्या बँक खात्यात पाठवले. अग्रवाल यांनी नीफेल यांच्याकडे अतिरिक्त ४९ लाखांची मागणी केली. (Fraud)

(हेही वाचा – Nikhat Zareen : ‘प्रत्येक स्पर्धेनं माझा खेळ सुधारला आहे,’ ऑलिम्पिकपूर्वी निखत झरिनचा वाढला आत्मविश्वास)

नीफेल यांनी विकत घेतेलेले विमान गुजरातमधील मुंद्रा बंदराकडे नेण्यास सुरुवात केली असताना, एका बँकेने नीफेल यांच्या कंपनीला ई-मेल पाठवून संबंधित विमान हे बँकेकडे गहाण ठेवण्यात आले आहे असे ई-मेलद्वारे कळवले. नीफेल यांच्या कंपनीने अधिक माहिती काढली असता अग्रवाल आणि त्यांच्या कंपन्यांविरुद्ध अनेक खटले प्रलंबित आहेत आणि विविध न्यायालये आणि न्यायाधिकरणांनी या प्रकरणांचा निर्णय होईपर्यंत कोणतीही मालमत्ता विकू नये असे आदेश त्यांना देण्यात आलेले असताना त्यांनी विमान विक्रीचा व्यवहार करून नीफेल यांच्या कंपनीची फसवणूक केली. नीफेल यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. आर्थिक गुन्हे शाखेने सहार पोलीस ठाण्यात अमित अग्रवाल यांच्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अग्रवाल यांना अटक करण्यात आली. (Fraud)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.