इथे झाडांवर फळे-फुले नाही तर असतात साप!; काय आहे रहस्य?

206
इथे झाडांवर फळे-फुले नाही तर असतात साप!; काय आहे रहस्य?
इथे झाडांवर फळे-फुले नाही तर असतात साप!; काय आहे रहस्य?

सहसा झाडांवर फळे, फुले असतात आणि ती आपल्याला तोडूनही घेता येतात. पण जगात अशाही काही गोष्टी आहेत ज्या ऐकाव्या तेवढ्या नवलच वाटतात. त्यांपैकीच एका गोष्टीची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ही माहिती आहे व्हिएतनाम इथल्या एका शेतीची. या शेतीमध्ये धान्य, फळे, फुले वाढत नाहीत तर चक्क साप वाढतात. होय, तुम्ही बरोबरच वाचलेत. बारा हेक्टर एवढ्या जागेत पसरलेले फार्म आहे. याला स्नेक फार्म म्हणून ओळखले जाते. हे फार्म पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातील लाखो पर्यटक येतात. या पर्यटकांना इथे विषारी सापांमधून फिरण्याचा एक वेगळाच अनुभव घेता येतो. तसेच जगभरातले वैज्ञानिक संशोधन करण्यासाठीही इथे येतात. या फार्मचे नाव आहे ट्री रान डाँग टॅम. या फार्ममध्ये औषधे तयार करण्यासाठी लागणाऱ्या वनस्पती आणि साप आहेत. खरेतर हे फार्म औषधे तयार करण्यासाठीच तयार केले आहे.

साप फळांप्रमाणे झाडांवर लटलेले आहेत. पाहा व्हिडिओ : 

(हेही वाचा – DCM Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणूक भाजपसोबत लढणार)

इथे वेगवेगळ्या प्रकारचे विषारी साप पाळले जातात. या सापांच्या विषापासून अँटिडोट्स तयार करण्यात येतात. या व्यतिरिक्त हे फार्म स्नेक रिसर्चसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. इथे असलेल्या सापांच्या वेगवेगळ्या प्रजातींवर अनेक प्रयोगही केले जातात. सर्पदंश झाल्यामुळे वर्षाकाठी पंधराशे लोक मृत्युमुखी पडतात. याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी आणि हे पूर्णपणे थांबवण्यासाठी हे सापांचे फार्म खूपच उपयोगी पडते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.