Lok Sabha Election 2024 : माधवी लता यांची मुस्लिम महिलांमध्ये लोकप्रिय वाढली

हैदराबादमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार माधवी लता यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे एआयएमआयएम सुप्रिमो असादुद्यीन ओवेसी यांचा किल्ला ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

103
Lok Sabha Election 2024 : माधवी लता यांची मुस्लिम महिलांमध्ये लोकप्रिय वाढली
  • वंदना बर्वे

भारतीय जनता पक्षाने (BJP) माधवी लता यांना हैदराबादच्या लढाईत उतरवून तेलाच्या उकळत्या कढईत पाणी शिंपडले आहे. गेल्या ४० वर्षांपासून हैदराबादची जागा ओवैसी यांच्या ताब्यात आहे. मात्र, १८ व्या लोकसभेत हैदराबादचे प्रतिनिधित्व करताना हिंदु महिला दिसू शकते. (Lok Sabha Election 2024)

माधवी लता यांच्यामुळे हैदराबादचा पारा वाढला

तेलंगणाची राजधानी आणि देशातील सर्वाधिक हॉट मतदारसंघात गणला जाणाऱ्या हैदराबाद लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपाच्या माधवी लता आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यातील सामना दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. (Lok Sabha Election 2024)

पाचव्या टप्प्यात निवडणूक

तेलंगणामध्ये लोकसभेच्या १७ जागा असून निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्थात २५ मे रोजी यासर्व १७ जागांवर मतदान होणे आहे. यातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे हैदराबाद. मागील ४० वर्षांपासून या मतदारसंघावर एआयएमआयएमचा कब्जा आहे. २००४ पासून असदुद्दीन ओवैसी हैदराबादचे खासदार आहेत. त्यापूर्वी, त्यांचे वडिल सुल्तान सलाहुद्दीन ओवैसी हे १९८४ पासून खासदार होते. (Lok Sabha Election 2024)

४० वर्षांची मक्तेदारी संपण्याच्या मार्गावर

मात्र, एआयएमआयएम आणि ओवैसी कुटुंबाची हैदराबामधील ४० मक्तेदारी या निवडणुकीत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कारण, भाजपाच्या उमेदवार माधवी लता विरोधी पक्षाच्या उमेदवाराला तगडी लढत देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतेच माधवी लता यांचे खूप कौतुक केले होते. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – PM Modi Kolhapur Sabha : शाहू महाराजांचा खरा अपमान तर मविआने केलाय; राऊतांच्या वक्तव्याला भाजपकडुन जोरदार प्रत्त्युत्तर)

माधवी लता बिजनेस वुमन कमी आणि समाजसेविका जास्त

४९ वर्षांच्या माधवी लता एक बिजनेस वुमन आहेत तर आहेच. पण, मोठ्या समाजसेविका सुध्दा आहेत. हैदराबादमध्ये मुस्लिमांची संख्या खूप आहे. यामुळे त्यांचे सामाजिक कार्य जुन्या शहरातील मुस्लिमबहुल भागत आहे. कोणतीही विशेष राजकीय पार्श्वभूमी नसतानाही माधवी लता आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. व्यावसायिकदृष्ट्या भरतनाट्यम नृत्यांगना असलेल्या माधवी लता यांनी तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी २०१८ मध्ये भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आणि गुंटूर पश्चिम मतदारसंघातून २०१९ ची आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. (Lok Sabha Election 2024)

माधवी लता मुस्लिमांमध्ये लोकप्रिय

भाजपाने माधवी लता यांना मुस्लिमबहुल हैदराबाद मतदारसंघातून उमेदवारी देण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचे या भागात असलेले सामाजिक कार्य. गरिब मुस्लिम महिलांच्या प्रगतीसाठी त्या कार्य करीत आहेत. याच कारणामुळे त्या मुस्लिम महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. (Lok Sabha Election 2024)

उत्तम वक्त्या

माधवी लता यांचे उत्तम वक्ता होणे हेही त्यांच्या पथ्यावर पडले आहे. त्या निराधार मुस्लिम महिलांना आर्थिक मदत करतात. ट्रिपल तलाक कायदा पारितही झाला नव्हता तेव्हापासून त्यांनी ट्रिपल तलाकविरूध्द अभियान चालविले आहे. यामुळे, पुरूष मंडळींपुढे साधे तोंड उघडण्याची मुभा नसलेल्या मुस्लिम महिला माधवी लता यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत. आपण दीर्घकाळापासून या मतदारसंघात काम करीत आहोत, असा माधवी लता यांचा दावा आहे. (Lok Sabha Election 2024)

ओवैसी यांच्यापुढे तगडे आव्हान

या निवडणुकीत ओवैसी यांना माधवी यांच्या तगड्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हैदराबादची जागा एआयएमआयएमचा बालेकिल्ला आहे. ओवैसी हा मुस्लिम चेहरा आहे, तर माधवी लता यांची प्रतिमा कट्टर हिंदुत्व समर्थक अशी आहे. दोघांमध्ये विचारधारेची लढाई आहे. (Lok Sabha Election 2024)

भाजपाचा फक्त एक आमदार

हैदराबाद लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सात जागा आहेत. सुमारे १९ लाख मतदार आहेत. हैदराबादमधील सात विधानसभांपैकी गोशामहल या एका मतदारसंघाचे आमदार भाजपाचे आहेत. केटी राजा सिंह असे त्यांचे नाव. उर्वरित सहा जागा आवैसी यांच्या पक्षाच्या ताब्यात आहेत. (Lok Sabha Election 2024)

सोशल मीडियावर सक्रिय

माधवी लता या लातम्मा फाउंडेशन आणि लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. त्यांचे हैदराबादमध्ये एक हॉस्पिटल आहे. त्या या रुग्णालयाच्या प्रमुख आहेत. सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि हिंदुत्ववादी भूमिकेमुळे सदैव चर्चेत असतात. माधवी लता एक गौशाला चालवतात आणि महाविद्यालयांमध्ये हिंदुत्व आणि भारतीय संस्कृती या विषयावर नियमित व्याख्याने देतात. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.