MTDC: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एमटीडीसी रिसॉर्टच्या दरात सवलत द्यावी, पर्यटकांची शासनाकडे मागणी

बीचजवळ असलेली शहरे, बर्फाळ प्रदेश, थंड हवेच्या ठिकाणी जाण्याऱ्या पर्यटकांचा ओढा वाढला आहे.

86
MTDC: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एमटीडीसी रिसॉर्टच्या दरात सवलत द्यावी, पर्यटकांची शासनाकडे मागणी
MTDC: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एमटीडीसी रिसॉर्टच्या दरात सवलत द्यावी, पर्यटकांची शासनाकडे मागणी

उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या की, वेध लागतात पर्यटनाचे. कुटुंबियांसह पर्यटन उन्हाळी सुट्टी निवांतपणे घालवता यावी, यासाठी घराबाहेर पडतात. वाढत्या उकाड्यामुळे पर्यटकांची फिरण्याच्या ठिकाणे बदलली आहेतच, शिवाय खासगी चारचाकी, बस, एसटी, रेल्वे यापेक्षा विमानाने प्रवास करून देश-विदेशात टूर काढत आहेत. यामध्ये पुणेकरांचा ओढा देश-विदेशातील थंड हवेच्या ठिकाणी वाढला आहे. (MTDC)

बीचजवळ असलेली शहरे, बर्फाळ प्रदेश, थंड हवेच्या ठिकाणी जाण्याऱ्या पर्यटकांचा ओढा वाढला आहे. जयपूर, लखनौ, कोचिन, अहमदाबाद आणि नागपूरसह विविध भागांत पर्यटक जात आहेत. पुण्यातून सध्या दुबई आणि सिंगापूर यासाठी आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होत असले, तरी मुंबईमार्गे विविध देशांमध्ये पर्यटक जात आहेत. पुण्याहून दररोज ९० विमाने उड्डाण करतात, तितकीच विमाने पुण्यात उतरतात. एकूण १८० विमानांचे उड्डाण दिवसभरात होत असते. दररोज २५ ते ३० हजार प्रवाशांना देशाच्या कानाकोपऱ्यांतून प्रवास करता येतो. (MTDC)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : माधवी लता यांची मुस्लिम महिलांमध्ये लोकप्रिय वाढली)

महाराष्ट्रातीलही थंड हवेच्या ठिकाणांना पसंती…
रायगड किल्ला, मुरुड-जंजिरा, माथेरान, घारापुरी लेण्या, पाली, महड, अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, रत्नागिरी, दापोली, गुहागर, गणपतीपुळे, मार्लेश्वर, राजापूर, माचाळ, चिपळूण, विजयदुर्ग किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, मालवण, वेंगुर्ला, आंबोली, लोणावळा, खंडाळा, चिखलदरा, जव्हार, तोरणमाळ, पन्हाळा, पाचगणी, भंडारदरा, महाबळेश्वर, माथेरान, म्हैसमाळ, कास पठार सातारा, मुंबई, प्रतिपंढरपूर (वाडी)-राममंदिर अमळनेर, पद्मालय एरंडोल, चांगदेव मुक्ताई मंदिर, पाटणादेवी चाळीसगाव, पंचवटी (नाशिक), त्र्यंबकेश्वर, वणी, मांगीतुंगी, शिर्डी, शनी-शिंगणापूर, सिद्धटेक, भीमाशंकर, देहू, आळंदी, जेजुरी, मोरगाव, रांजणगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर (पुणे), शिखर शिंगणापूर (सातारा), औदुंबर (सांगली), कोल्हापूर, ज्योतिबा, नरसोबाची वाडी, कुंभोज महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, किल्ले पन्हाळा, अक्कलकोट, पंढरपूर (सोलापूर), वेरुळ, पैठण (छत्रपती संभाजीनगर), परळी वैजनाथ (बीड), औंढा नागनाथ (हिंगोली), तुळजापूर (धाराशिव), नांदेड, माहूर (नांदेड) बीड आदी ठिकाणी पर्यटकांचा जास्त कल असल्याचे आढळत आहे.

एमटीडीसी रिसॉर्टच्या दरांत सवलत द्यावी, प्रवाशांची मागणी
उन्हाळी सुट्यांमुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) रिसॉर्टला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजंटा फर्दापूर, वेलणेश्वर, ताडोबा, माळशेज, भंडारदरा, तारकार्ली, लोणार, भीमाशंकर, कार्ला, हरिहरेश्वर, छ. संभाजीनगर, महाबळेश्वर, नागपूर, सिल्लारी, पानशेत, खारघर, माथेरान, कुणकेश्वर, चिखलदरा, कोयना लेक, शिर्डी, वर्धा, ग्रेप पार्क, टिटवाळा, एलिफंटा, सिंहगड रिसॉर्ट, पर्यटक निवास निरा नरसिंहपूर या एमटीडीसी रिसॉर्टला पर्यटकांची पसंती लाभत आहे. मात्र, एमटीडीसीचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे या दरामध्ये शासनाने सवलत द्यावी, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.