धक्कादायक : ६५ वर्षांत भारतात Hindu लोकसंख्या ६ टक्क्यांनी घटली, तर Muslim ५ टक्क्यांनी वाढले; काय म्हटलंय सरकारी अहवालात?

पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या इतर देशांसोबत तुलना करत तेथे बहुसंख्यक मुस्लिम समाजाचा एकूण लोकसंख्येतील वाटा वेगाने वाढला असल्याचे म्हटले आहे.

264
देशात अधूनमधून वाढत्या लोकसंख्येचा विषय चर्चेला येतो तेव्हा हिंदूंची लोकसंख्या घटत असून मुसलमानांची (Muslim) लोकसंख्या वाढत असल्याचे म्हटले जाते. परंतु याला कुठेही ठोस पुरावा नसल्याने हा दावा केवळ दावाच उरतो, परंतु आता हा दावा सिद्ध करणारा अहवालच समोर आला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात भारतामध्ये 1950 ते 2015 या 65 वर्षांच्या कालावधीत बहुसंख्यक हिंदू समाजाच्या लोकसंख्येत ६ टक्क्यांनी घट झाली आहे, तर मुस्लिमांची संख्या ५ टक्क्यांनी वाढल्याचे म्हटले आहे.

काय म्हटले या अहवालात? 

या अहवालानुसार याचा कालावधीत एकूण लोकसंख्येतील ख्रिश्चनांचा वाटा 5.38 टक्के आणि शीखांचा वाटा 6.58 टक्क्यांनी वाढला आहे. याशिवाय बौद्धांचा वाटाही वाढला आहे. अहवालानुसार, 1950 मध्ये भारताच्या लोकसंख्येत हिंदूंचा वाटा 84 टक्के होता. आता तो 78 टक्क्यावर आला आहे. गेल्या ६५ वर्षांपूर्वी भारताच्या लोकसंख्येत मुस्लिमांचा (Muslim) वाटा 9.84 टक्के एवढा होता. तो आता 14.09 टक्के झाला आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या देशातील बहुसंख्य समाजाची लोकसंख्या कमी झाली, अशा शेजारील देशांमध्ये म्यानमारनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. या कालावधीत म्यानमारमध्ये बहुसंख्यक बौद्ध समुदायाच्या लोकसंख्येचा वाटा 10 टक्क्यांपर्यंत घटली आहे. तसेच नेपाळच्या लोकसंख्येतही बहुसंख्यक हिंदुंचा वाटा 3.6 टक्क्यांनी कमी झाला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने आपल्या अहवालात एकूण 167 देशांचा अभ्यास केला आहे. भारतात स्थिरता दिसून आली आहे. भारतातील अल्पसंख्याकांना केवळ संरक्षणच मिळालेले नाही, तर त्यांची लोकसंख्याही झपाट्याने वाढत असल्याचे या अभ्यासात म्हणण्यात आले आहे. या समितीने पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या इतर देशांसोबत तुलना करत तेथे बहुसंख्यक मुस्लिम (Muslim) समाजाचा एकूण लोकसंख्येतील वाटा वेगाने वाढला असल्याचे म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.