Missing Womens : तीन महिन्यांत मुंबईतून ३८३ मुली बेपत्ता

या वर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत महाराष्ट्रात १६-३५ वयोगटातील ३,५९४ मुली आणि महिला बेपत्ता झाल्या.

170

द केरळ स्टोरी सिनेमानंतर आता देशभरात तरुणी-महिला बेपत्ता होण्याच्या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्य महिला आयोगाने स्वत: महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या महिलांची आकडेवारी दिली. आता मागील तीन महिन्यांत मुंबईमधून ३८३ मुली गायब झाल्याचे समोर आले आहे.

या वर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत महाराष्ट्रात १६-३५ वयोगटातील ३,५९४ मुली आणि महिला बेपत्ता झाल्या, त्यापैकी ३८३ एकट्या मुंबईतून बेपत्ता झाल्याची आकडेवारी सांगते. हे क्रमांक महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या वेबसाइटवर अपलोड केले आहेत. त्यात म्हटले आहे की बेपत्ता प्रकरणांची सर्वाधिक संख्या – ३८३ मुंबई शहरातील आहेत. अहमदनगरमध्ये १८३ बेपत्ता प्रकरणे, नागपूर ग्रामीण आणि नाशिक ग्रामीणमध्ये प्रत्येकी १६९, पुणे ग्रामीणमध्ये १५६ आणि पुणे शहरात १४८ प्रकरणे आहेत. राज्यातून गेल्या काही महिन्यांत महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी चिंताजनक असून गृह विभागाने याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करावी. विभागाने शोध मोहीम राबवावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल दर १५ दिवसांनी आयोगाला सादर करावा, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

(हेही वाचा Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवणाऱ्यांनी हातात धातूच्या वस्तू का बाळगल्या होत्या? – महंत अनिकेतशास्त्री)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.