PM Narendra Modi : यांच्या कोल्हापुरातील सभेपूर्वी सुरक्षेसाठी ‘हा’ घेतला निर्णय

अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी घेतला सभा स्थळांचा आढावा.

100
PM Narendra Modi : यांच्या कोल्हापुरातील सभेपूर्वी सुरक्षेसाठी 'हा' घेतला निर्णय

देशभरात लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असून, तिसऱ्या टप्प्यातील (Lok Sabha election 3rd Phase) प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कोल्हापूर येथील तपोवन मैदानावर (Kolhapur Tapowan Maidan) सभा होणार आहे. या सभेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले असून सुरक्षेच्या दृष्टीने सभेच्या ठिकाणी खाजगी ड्रोन कॅमेरे उडवण्यास बंदी (Private drone camera flight ban) घालण्यात आली आहे. तसेच दीड हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात येणार आहेत. या सभेच्या ठिकाणी शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांची प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत. तर राज्य गुप्त वार्ता विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग (ADGP Sukhwinder Singh) यांनी कोल्हापूर येथील तपोवन मैदानाचा आढावा घेतला.  (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Supreme Court: ‘नोटाला सर्वाधिक मतदान झालं तर…’ , सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून मागवले उत्तर )

महायुतीचे (Mahayuti) उमेदवार संजय मंडलिक (Sanjay mandlik) व धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. ही सभा अतिविराट होईल असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hasan Mushrif) यांनी व्यक्त केला. तर या सभेला दोन लाखाच्या वर गर्दी होईल, असेही ते म्हणाले. (PM Narendra Modi)

 (हेही वाचा – Sadabhau Khot: “पण हे म्हातारं लय खडूस”, सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर जहरी टीका)

दरम्यान, अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी अलंकार हॉलमध्ये बंदोबस्ताचा आढावा घेऊन सभेसंबंधी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीनंतरच नेते, कार्यकर्ते, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि सभेच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. तसेच सिंग यांनी विमानतळापासून तपोवनकडे पोहोचणारा मार्गाची पाहणी केली. गुरुवारी रात्रीच बंदोबस्ताचे वाटप केले असून, महत्त्वाच्या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. (PM Narendra Modi)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.