North East Mumbai Lok Sabha Election 2024 : संजय पाटील यांना उबाठा शिवसैनिकच आपले मानतात?

उबाठा शिवसेनेत जाऊन संजय पाटील हे जुने झाले असले तरी आजही शिवसैनिक त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मानत असल्याचे दिसून येत आहे.

103
North East Mumbai Lok Sabha Election 2024 : संजय पाटील यांना उबाठा शिवसैनिकच आपले मानतात?

उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात महायुतीच्यावतीने शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील हे निवडणूक रिंगणात असले तरी प्रत्यक्षात उबाठा शिवसेना मात्र पाटील यांना आपले मानतच नसल्याचे ऐकायला मिळत आहे. मागील काही दिवसांपूर्वी संजय पाटील यांनी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत तुमचे तुम्ही बघुन घ्या अशाचप्रकारची उत्तरे ऐकायला मिळाली. त्यामुळे उबाठा शिवसेनेत जाऊन संजय पाटील हे जुने झाले असले तरी आजही शिवसैनिक त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मानत असल्याचे दिसून येत आहे. (North East Mumbai Lok Sabha Election 2024)

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपाच्यावतीने मिहिर कोटेचा आणि उबाठा शिवसेनेच्यावतीने संजय दिना पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले आहे. मात्र, या लोकसभेच्या प्रचारादरम्यान मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रथाचा स्टिकर फाडणे, रॅलीवर दगडफेक करणे तसेच घाटकोपरमध्ये मराठी पत्रक वाटपास गुजराती सोसायट्यांमधून विरोध होणे अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे यासर्व घटनांमुळे ईशान्य मुंबईतील लोकसभा निवडणूक प्रचाराकडे सर्वांचे लक्ष आहे. (North East Mumbai Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Eelction 2024 : पावसात भिजून किंवा रडून निवडणूक जिंकता येत नाही ; भाजपा नेत्याचा शरद पवारांसह रोहित पवारांवर निशाणा)

पाटील यांची आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून ओळख

दरम्यान, उबाठा शिवसेनेचे उमेदवार संजय पाटील हे आपल्या पक्षाच्या बैठका घेऊन त्यांच्यासोबत प्रचाराची रणनिती आखत आहेत. मात्र, या प्रचाराच्या रणनितीच्या बैठकांमध्ये संजय पाटील यांना उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ‘त्यांचे तुम्ही बघू घ्या’ अशाप्रकारची वाक्ये ऐकायला मिळत आहे. मुळात संजय पाटील हे विधानसभा निवडणुकींनतर शिवसेनेत आले असून पक्षाने त्यांना लोसकभा मतदार संघांचे समन्वयकाची जबाबदारी सोपवली आहे. पाटील यांची आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून ओळख आहे. (North East Mumbai Lok Sabha Election 2024)

परंतु शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही त्यांची ओळख पुसली गेली नसून उबाठा शिवसेनेत राहिलेल्या पाटील यांना पक्षाचे पदाधिकारी आजही आपले नेते मानत नसल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या बैठकांमध्ये अशाप्रकारची वागणूक मिळत असल्याने संजय पाटील हेही आश्चर्यचकीत होताना दिसले असून तुमचे आमचे काही नाही, आपण सर्व एकच आहोत असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. त्यामुळे पाटील यांना पक्षाचे पदाधिकारीच आपले मानायला तयार नसतील तर या भागातील मतदारांनी कसे आपले करावे अशाप्रकारचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (North East Mumbai Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.