Madha LS Constituency : माढा मतदार संघात महायुतीचे पारडे जड

लोकसभा मतदार एकूण सहा विधानसभा मतदार संघ असून काही सातारा तर काही सांगली जिल्ह्यात आहेत. महायुतीत भाजपासोबत शिवसेना (शिंदे), अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षही समाविष्ट आहे.

194
Madha LS Constituency : माढा मतदार संघात महायुतीचे पारडे जड

माढा मतदार संघात उद्या मंगळवारी ७ मे ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदार संघात महायुतीकडून भाजपाचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील अशी थेट लढत होणार आहे. या लोकसभा मतदार संघात महायुतीचे पारडे जड असल्याने निंबाळकर यांना निवडणूक सोपी असली तरी मोहिते-पाटील यांना गृहीत धरून चालणार नाही. (Madha LS Constituency)

मुख्य प्रश्न पाणी, रेल्वे दळणवळण

या मतदार संघात सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा असून रेल्वेमार्गाने दळणवळणाचे जाळे विकसित झाले नसल्याने रास्ते मार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. गेली अनेक वर्षे त्यावर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने निंबाळकर यांना दिलासा मिळाला असला तरी त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. (Madha LS Constituency)

(हेही वाचा – Lok Sabha Eelction 2024 : पावसात भिजून किंवा रडून निवडणूक जिंकता येत नाही ; भाजपा नेत्याचा शरद पवारांसह रोहित पवारांवर निशाणा)

निंबाळकर यांच्यासाठी वातावरण अनुकूल

लोकसभा मतदार एकूण सहा विधानसभा मतदार संघ असून काही सातारा तर काही सांगली जिल्ह्यात आहेत. महायुतीत भाजपासोबत शिवसेना (शिंदे), अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षही समाविष्ट आहे. माढा विधानसभा क्षेत्रात बबन शिंदे तर फलटणमध्ये दीपक चव्हाण आमदार असून ते राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. करमाळा मतदार संघात अपक्ष संजय शिंदे आहेत पण त्यांचा कल हा अजित पवार यांच्याकडे आहे. भाजपाचे जयकुमार गोरे आणि राम सातपुते हे माण आणि माळशिरस या मतदार संघाचे प्रतिनिधित्व विधानसभेत करत आहेत तर सांगोला मतदार संघात शहाजीबापू पाटील शिवसेना (शिंदे) पक्षात आहेत. त्यामुळे एकूणच निंबाळकर यांच्यासाठी वातावरण अनुकूल आहे. (Madha LS Constituency)

जातीय समीकरण

माढा लोकसभा मतदार संघाचे जातीय समीकरण पाहिले तर धनगर समाज मोठ्या प्रमाणावर असून त्याखालोखाल मराठा आणि मग ओबीसी समाज आहे. दोन्ही तगडे उमेदवार हे मराठा आहेत. धनगर समाजाचे नेते, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे महायुतीचे परभणीचे उमेदवार आहेत. त्यामुळे धनगर मते निंबाळकर यांच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे. (Madha LS Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.