Bus Stand शेजारी पार्क करण्यात आलेल्या ९ हजार वाहनांवर कारवाई

दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकाकडून १० लाख २१ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

95
Bus Stand शेजारी पार्क करण्यात आलेल्या ९ हजार वाहनांवर कारवाई

बस थांब्याजवळ (Bus Stand) वाहने पार्क करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांकडून दणका देण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या विशेष मोहीम दरम्याम मुंबईतील बस थांब्याजवळ बेकायदेशीर वाहने पार्क करणाऱ्या ९ हजार ६५८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई १० दिवसांच्या विशेष मोहिमेदरम्यान करण्यात आली आहे. (Bus Stand)

मुंबईत ‘नो पार्किंग झोन ‘मध्ये वाहने पार्क करून वाहतुकीला बाधा आणली जात आहे, त्याच बरोबर शाळा, कॉलेज आणि बस थांब्यासमोर (Bus Stand) वाहने पार्क करून बसमध्ये चढणारे आणि उतरणारे विद्यार्थी, वयोवृद्ध आणि दिव्यांगांना अडथळा निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी मुंबई वाहतूक पोलिस विभागाकडे प्राप्त झालेल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने वाहतूक विभागाने मुंबई शहर आणि उपनगरात विशेष मोहिम राबविली. (Bus Stand)

(हेही वाचा – Road Pothole : यंदा खड्ड्यांसाठी फक्त मास्टिक अस्फाल्टचाच वापर)

२४ एप्रिल ते ५ मे दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी बस थांब्याच्या (Bus Stand) शेजारी बेकायदेशीररित्या पार्क करण्यात आलेल्या ९ हजार ६५८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकाकडून १० लाख २१ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई मुंबईसह उपनगरातील वाहतूक विभागाकडून करण्यात आली असून ही कारवाई पुढेही सुरू राहील असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. (Bus Stand)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.