Lok Sabha Eelction 2024 : पावसात भिजून किंवा रडून निवडणूक जिंकता येत नाही ; भाजपा नेत्याचा शरद पवारांसह रोहित पवारांवर निशाणा  

भाजप नेत्याने शरद पवार यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. शरद पवार यांच्या आजारपणावर भाष्य करताना त्यांनी टीका केली आहे. रोहित पवारांवरही टीका करण्यात आली आहे. वाचा सविस्तर......

82
Lok Sabha Eelction 2024 : पावसात भिजून किंवा रडून निवडणूक जिंकता येत नाही ; भाजपा नेत्याचा शरद पवारांसह रोहित पवारांवर निशाणा  

लोकसभा २०२४ च्या निवडणूक (Lok Sabha Eelction 2024 ) प्रचारांचा धुराळा उडाला असून, राजकीय नेते मात्र सभा घेण्यात कुठेच कमी पडत नाहीये. मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून, त्यापूर्वी रविवारी संध्याकाळी ०६ वाजे पर्यंत प्रचारांच्या सभा थंडावल्या. सर्व राज्याचे लक्ष लागून असेलल्या बारामती मतदारसंघात (Baramati Constituency) शरदचंद्र पवार गटाच्या रोहित पवारांचे (Rohit Pawar) भाषण चालू असताना, डोळ्यात अश्रू आले. यावरून भाजपाचे (BJP) नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी टीका केली. सभा करताना पावसात भिजणे किंवा कधी आजारी पडायचे तर कधी रडायचे… आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

(हेही वाचा – राजन विचारे आनंद दिघेंचे नकली शिष्य ; CM Eknath Shinde यांचा राजन विचारेंवर हल्लाबोल )

गिरीश महाजन म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वयोमानानुसार त्यांची तब्येत बिघडत असते, त्यांच्या प्रकृतीवर बोलणे योग्य नाही असं महाजन म्हणाले, तर रोहित पवार सभेत बोलताना दोन-चार शब्द बोलले की त्यांना लगेच रडू फुटतं. रडून लोकसभा  निवडणुका जिंकता येत नसतात. त्यामुळे अशा कारणांनी नागरिकांचे जास्त वेळ भावनिक करू शकत नाही. असे गिरीश महाजन म्हणाले.

(हेही वाचा – Monkey : गुहागर तालुक्यात माकडांचा उच्छाद; पाभरे गावातील घर, फळबागांचे नुकसान)

रोहित पवारांनी रडण्यापेक्षा मुद्यांवर बोलावं, राजकरणांवर बोलावं, विकासांवर, कामांवर बोलावं, तसेच रोहित पवार तरुण आहेत, त्यांच्या पाठीमागे तरुणांची मोठी ताकद आहे. असे दोन-चार शब्द बोलल्यानंतर रडत बसण्यापेक्षा त्यांनी स्वत:च्या  हिमतीवर मतं मागावीत असा सल्ला गिरीश महाजन यांनी दिला. रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता सुद्धा येणार नाहीत. (Lok Sabha Eelction 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.