IPL 2024 Rinku Singh : अखेर रिंकू सिंगला विराटने दिली नवीन बॅट

IPL 2024 Rinku Singh : विराटने स्वाक्षरी करून भेट दिलेली रिंकू सिंगची बॅट अलीकडे तुटली होती. 

102
IPL 2024 Rinku Singh : अखेर रिंकू सिंगला विराटने दिली नवीन बॅट
  • ऋजुता लुकतुके

कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) घणाघाती फलंदाज रिंकू सिंग सध्या विराट कोहलीकडून परत एकदा बॅट भेट मिळाल्यामुळे खुश आहे. या हंगामात विराटकडून त्याला दुसऱ्यांदा बॅट भेट मिळाली आहे. एका व्हायरल व्हीडिओत मध्यंतरी रिंकू सिंग विराटकडे आणखी एक बॅट भेट मागताना दिसत होता. आणि आधीची बॅट तुटली आहे हे कळल्यावर विराट स्वाक्षरी करून बॅट द्यायला उत्सुक नव्हता. (IPL 2024 Rinku Singh)

पण, कोलकाता संघाने ईडन गार्डन्सवर बंगळुरूचा एका धावेनं निसटता पराभव केला आणि या सामन्यानंतर रिंकूने विराटकडे पुन्हा एकदा बॅट मागितली. यावेळी विराट ही मागणी टाळू शकला नाही. कोलकाता नाईट रायडर्सने हा व्हिडिओ अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. (IPL 2024 Rinku Singh)

(हेही वाचा – Salman Khan Firing Case : पंजाबमधून अटक करण्यात आलेल्या दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी)

या व्हिडिओत विराटने दिलेली बॅट एका फिरकीपटूला खेळताना तुटली असं रिंकू सिंग सांगत आहे. पण, आता विराटने रिंकूला नवीन बॅट दिली आहे. कारण, नवीन ट्रेंडिंग व्हिडिओत रिंकू चाहत्यांना त्याची नवीन बॅट दाखवतो आहे. एक चाहता त्याला विचारतो, ‘रिंकू भाई, नवीन बॅट मिळाली का?’ त्यावर पुन्हा एकदा बॅट दाखवत रिंकू म्हणतो, ‘हा. मिळाली ना.’ (IPL 2024 Rinku Singh)

यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाताचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर बंगळुरू संघ तळाला आहे. यंदाच्या हंगामात कोलकाताकडून रिंकू सिंग ७ सामने खेळला आहे. यात त्याने १५० च्या स्ट्राईक रेटने १०७ धावा केल्या आहेत. (IPL 2024 Rinku Singh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.