Mamata Banerjee : ममता बॅनर्जी हिंदूंना म्हणाल्या ‘काफिर’; भाजपाला पाठिंबा द्यालं, तर अल्ला शपथ…सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी भाजपाला पाठिंबा देणाऱ्यांना थेट धमकावले आहे.

262

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मोठमोठ्या नेत्याच्या प्रचारसभा सुरु आहेत. त्यामध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्याच वेळी टीकेचे स्तरही घसरत चालला आहे. अशा वेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ ऐन निवडणुकीच्या काळात सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी हिंदूंना थेट काफिर म्हटले आहे. इतकेच नाही तर भाजपाला मदत करणाऱ्याला अल्लाची शपथ मी त्यांना माफ करणार नाही, अशी धमकी दिली आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांच्या समोर अडचण निर्माण झाली आहे.

काय म्हटले आहे ममता बॅनर्जी? 

आम्ही आमच्या मर्जीने वागणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा. भाजपाला मदत करू नका. तुम्ही भाजपाला मदत केली तर अल्लाची शपथ तुम्हाला कुणी माफ करणार नाही. मी तर माफ करणार नाही. या लढाईत आम्ही लढणार, आम्ही हटणार नाही. जे काफिर आहेत, ते घाबरतात आणि मारतात. जे लढतात ते जिवंत राहतात, असे भडकाऊ, चिथावणीखोर तसेच धमकावणारे भाषण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी भाजपाला पाठिंबा देणाऱ्यांना थेट धमकावले आहे. भाजपाला पाठिंबा देणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही, अशी सरळ धमकीच अल्लाची शपथ घेत बॅनर्जी यांनी दिली आहे. इतकेच नाही तर हिंदूंना काफिर म्हणत ते मरणारच आहेत, असेही त्या अप्रत्यक्षपणे म्हणाल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी हिंदूंविषयी अपमानास्पद शब्दांचा वापर करण्याची ही पहिली वेळ नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होऊ लागल्यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत, असे नेटकरी म्हणत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.