Lok Sabha Election 2024 : नांदेडमध्ये मतदान केंद्रात कुऱ्हाडीने EVM फोडले

दुसऱ्या टप्प्यात देशातील १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ लोकसभा जागांवर राज्यात मतदान होत असून नांदेडमध्ये विचित्र घटना घडली आहे.

234
Lok Sabha Election 2024 : नांदेडमध्ये मतदान केंद्रात कुऱ्हाडीने EVM फोडले

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या दुसऱ्या टप्प्यात देशातील १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ लोकसभा जागांवर राज्यात मतदान होत आहे.  दुसऱ्या टप्प्यात (Election 2nd Phase) महाराष्ट्रातील प्रत्येकी ०८ जागांसाठी मतदान पार पडत आहे. यामध्ये राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांत शुक्रवारी २६ एप्रिल रोजी मतदान होत असून, मतदानासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. (Lok Sabha Election 2024 )

(हेही वाचा – Mamata Banerjee : ममता बॅनर्जी हिंदूंना म्हणाल्या ‘काफिर’; भाजपाला पाठिंबा द्यालं, तर अल्ला शपथ…सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान, नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून, नांदेड येथील रामतीर्थ गावात एका तरुणाने कुऱ्हाडीच्या सहाय्यने एव्हीएम (EVM) मशीन (Axe EVM Broke) फोडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, नागरिकांकडून मतदान केंद्रावरील सुरक्षा संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. (Lok Sabha Election 2024 )

(हेही वाचा – PM Narendra Modi : यांच्या कोल्हापुरातील सभेपूर्वी सुरक्षेसाठी ‘हा’ घेतला निर्णय)

नांदेड लोकसभा मतदार संघात (Nanded Lok Sabha Election) महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलिकर (Prataprav Chikhalikar) यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हान (Vasant Chavan) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कॉँग्रेसमधून भाजपात गेलेले विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.