Delhi Mayor Election : दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक रद्द, पीठासीन अधिकारी नाही

पुढील महापौर निवडणुकीपर्यंत विद्यमान महापौर आणि उपमहापौर आपली पदे सांभाळतील, असेही एलजींनी नोटमध्ये म्हटले आहे.

79
Delhi Mayor Election : दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक रद्द, पीठासीन अधिकारी नाही

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पीठासीन अधिकाऱ्याची निवड न केल्यामुळे दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी २६ एप्रिल रोजी निवडणूक होणार होती. परंतु पीठासीन अधिकाऱ्याची निवड न झाल्यामुळे निवडणूक पुढे ढकलावी लागली. निवडणुकीची पुढील तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. (Delhi Mayor Election)

दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (२६ एप्रिल) होणार होती, मात्र पीठासीन अधिकारी ठरत नसल्याने ती पुढे ढकलण्यात आली आहे. दिल्ली महानगरपालिका अधिनियम, १९५७ च्या कलम ७७(अ) अंतर्गत पीठासीन अधिकाऱ्याचे नामनिर्देशन आवश्यक असल्याचे महानगरपालिकेच्या सचिवांनी नोटीस जारी केली. त्यामुळे शुक्रवारी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक शक्य नाही. (Delhi Mayor Election)

आम आदमी पक्षाने आरोप केला की, उपराज्यपालांच्या कार्यालयानेच निवडणूक “रद्द” केली कारण त्यांना पीठासीन अधिकारी नियुक्त करायचे होते. तर पत्रकार परिषदेत आप नेते दुर्गेश पाठक यांनी आरोप केला की, एल-जी कार्यालयाने सांगितले की, ते मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करतात. “निवडणूक आयोगाची परवानगी असतानाही भाजपाने ही निवडणूक रद्द केली. ते मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करतात, असे सांगून एलजी कार्यालयाने ही निवडणूक रद्द केली आहे. त्यांनी मदत आणि सल्ल्याचे पालन न केल्याची उदाहरणे यापूर्वीही घडली आहेत, असा आरोप देखील दुर्गेश पाठक यांनी केला आहे. (Delhi Mayor Election)

(हेही वाचा – Mamata Banerjee : ममता बॅनर्जी हिंदूंना म्हणाल्या ‘काफिर’; भाजपाला पाठिंबा द्यालं, तर अल्ला शपथ…सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)

आपच्या नेत्यांनी केला हा आरोप 

DMC कायदा, १९५७ (सुधारित २०२२ नुसार) कलम ७७(a) नुसार पीठासीन अधिकाऱ्याचे नामनिर्देशन अनिवार्य आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक वेळापत्रकानुसार होणे शक्य होणार नाही. त्यानुसार, अजेंडातील सर्वसाधारण अधिकृत कामकाजांतर्गत, महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीसंदर्भातील बाब क्रमांक ३ आणि ४ याद्वारे पुढे ढकलण्यात येत आहेत…” असे MCD नोटिसमध्ये म्हटले आहे. (Delhi Mayor Election)

आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, पीठासीन अधिकाऱ्याची नियुक्ती आत्तापर्यंत व्हायला हवी होती आणि परंपरेने विद्यमान महापौर शेली ओबेरॉय हे पीठासीन अधिकारी असावेत. “परंतु मुख्य सचिवांनी ज्या प्रकारे निवडून आलेल्या सरकारला बायपास करून थेट L-G कार्यालयात फाइल पाठवली, त्यावरून आम्हाला कटाचा वास येतो. L-G कार्यालयाने कोणतेही उत्तर दिले नाही आणि ते आता केरळमध्ये आहे,” असा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे. (Delhi Mayor Election)

(हेही वाचा – PM Narendra Modi : यांच्या कोल्हापुरातील सभेपूर्वी सुरक्षेसाठी ‘हा’ घेतला निर्णय)

काय म्हटले आहे नोटमध्ये ? 

दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांनी पीठासीन अधिकारी आणि महापौरांच्या निवडीबाबत दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांना एक नोट पाठवली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुख्य सचिवांनी पीठासीन अधिकारी नियुक्तीचा प्रस्ताव २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. मुख्यमंत्री सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यामुळे ही फाईल त्यांच्यासमोर ठेवण्यास व त्यांच्या सूचना घेण्यास मुख्यमंत्री कार्यालय असमर्थ असल्याचे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झाले होते. (Delhi Mayor Election)

एलजी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या कोणत्याही प्रतिसादाच्या अनुपस्थितीत, मी पीठासीन अधिकारी नियुक्त करण्यासाठी प्रशासक म्हणून माझ्या अधिकाराचा वापर करणे योग्य मानत नाही. पुढील महापौर निवडणुकीपर्यंत विद्यमान महापौर आणि उपमहापौर आपली पदे सांभाळतील, असेही एलजींनी नोटमध्ये म्हटले आहे. (Delhi Mayor Election)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.