West Indies Team in Nepal : विंडिज संघासाठी नेपाळमध्ये हमालाचीही सोय नाही

West Indies Team in Nepal : वेस्ट इंडिजचा अ संघ नेपाळ विमानतळावर आपलं सामान स्वत:च उचलताना दिसला. 

113
West Indies Team in Nepal : विंडिज संघासाठी नेपाळमध्ये हमालाचीही सोय नाही
  • ऋजुता लुकतुके

वेस्ट इंडिजचा अ संघ (West Indies Team) सध्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी नेपाळमध्ये आहे. पण, गुरुवारी संघ नेपाळच्या कीर्तीपूर इथं पोहोचला तेव्हा तेव्हा संघाचं सामान आणि क्रिकेट किट उचलण्यासाठीही कुणी नव्हतं. त्यामुळे खेळाडूंना स्वत:च हे सामान उचलून एका छोट्या टेंपोत टाकावं लागलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (West Indies Team in Nepal)

विंडिज अ संघ २७ एप्रिलपासून कीर्तीपूरच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर ५ टी-२० सामने खेळणार आहे. काठमांडू विमानतळावर विंडिज खेळाडूंनीच आपलं सामान ‘छोटा हत्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंपोत सामान भरलं. नेपाळ बरोबरची ही टी-२० मालिका ही विंडिज संघाच्या टी-२० विश्वचषक तयारीचाच एक भाग आहे. या विश्वचषक स्पर्धेत यजमान असल्यामुळे विंडिजला खेळण्याची संधी मिळणार आहे. नाहीतर एकदिवसीय विश्वचषकासाठी संघ पात्र ठरू शकला नव्हता. विश्वचषकासाठी क गटात विंडिज संघाचा समावेश असून त्यांच्याबरोबर अफगाणिस्तान, न्यू जिनी पापुआ, युगांडा आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. (West Indies Team in Nepal)

(हेही वाचा – PM Narendra Modi : यांच्या कोल्हापुरातील सभेपूर्वी सुरक्षेसाठी ‘हा’ घेतला निर्णय)

दुसरीकडे नेपाळचा संघ ड गटात असून त्यांच्याबरोबर दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेदरलँड्स आणि बांगलादेश हे संघ आहेत. अलीकडे आशियाई क्रीडास्पर्धेत नेपाळच्या संघाने टी-२० स्पर्धेच्या इतिहासातील सगळ्यात मोठी धावसंख्या नोंदवली होती. मंगोलिया विरुद्ध गटवार साखळीत त्यांनी ३ बाद ३१४ धावांचा डोंगर उभा केला होता. (West Indies Team in Nepal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.