Lok Sabha Election 2024 : अहमदनगर लोकसभा निवडणुकीत ‘रायगड पॅटर्न’; लंकेंची अडचण

एका बाजूला लंके राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असल्याने त्यांची निशाणी नवीन आहे.

134
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारांचा अर्ज भरण्याचा शुक्रवार, २६ एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. या दिवशी या ठिकाणी रायगड पॅटर्न राबवण्यात आला. रायगड येथे एखाद्या उमेदवाराची मते खाण्यासाठी त्याच्याच नावाचे अनेक उमेदवार उभे केले जातात, त्यानुसाद अहमदनगरमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या नावाच्या आणखी एका उमेदवाराने अर्ज भरला आहे. त्यामुळे लंकेंची अडचण होण्याची शक्यता आहे.

चिन्हही नवीन आणि उमेदवार डमी 

यामुळे आता अहमदनगर लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) दोन निलेश लंके उभे राहणार आहेत. निलेश साहेबराव लंके नावाच्या व्यक्तीने आपला अर्ज दाखल केला आहे. एका बाजूला लंके राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असल्याने त्यांची निशाणी नवीन आहे, तसेच लंके नावाचे दोन उमेदवार असल्यानेही लंकेची अडचण वाढणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव निलेश ज्ञानदेव लंके असे आहे. यामुळे तुतारी वाजविणारा माणूस मतदारांना शोधावा लागणार आहे. गडबडीत डमी निलेश लंके यांच्या नावासमोरील बटण देखील दाबले जाण्याची शक्यता आहे. ईव्हीएमसमोर भल्याभल्यांची धांदल उडते, यामुळे डमी उमेदवार असेल तर चुकून त्याला मतदान केले जाते. रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते नावाचे दोन उमेदवार आहेत. तिथे २०१४ ला तसाच घोळ झाला होता. सुनिल तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराने ११००० मते मिळविली होती, तर तटकरे २००० मतांनी पडले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.