Sadabhau Khot: “पण हे म्हातारं लय खडूस”, सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर जहरी टीका

109
Sadabhau Khot:
Sadabhau Khot: "पण हे म्हातारं लय खडूस", सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर जहरी टीका

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जहरी टीका केली आहे. रणजीतसिंह निंबाळकरांच्या प्रचारात बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांचा उल्लेख म्हातारा असा केला आहे. “शरद पवारांचं वय ८४ आहे म्हणून ते ८४ सभा घेणार अशाही चर्चा सुरु आहे. पण मला सांगा शरद पवारांना काय काम आहे? या वयातही आमच्यासारख्यांना ते संधी देत नाहीत.” असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले.

नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?

“लोकसभेची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा म्हणजेच प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. मतदारसंघात शरद पवारांबाबत अनेक गोष्टी ऐकू येतील. शरद पवारांचं वय ८४ आहे म्हणून ते ८४ सभा घेणार अशाही चर्चा सुरु आहे. पण मला सांगा शरद पवारांना काय काम आहे? त्यांना म्हशी वळायच्या आहेत की जनावरांना पाणी पाजायचं आहे? या वयातही आमच्यासारख्यांना ते संधी देत नाहीत.” असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले.

पण हे म्हातारं लय खडूस

“मुलगा कर्तबगार झाला की बाप त्याच्या हाती प्रपंच देतो आणि गप्प बसतो. पण हे म्हातारं लय खडूस. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय. अजित पवार (Ajit Pawar) किल्ली बघून बघून म्हातारे झाले. मग अजित पवारांच्या लक्षात आलं की म्हातारं काही कंबरेची किल्ली काढत नाही, म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतोय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला प्रपंच करु द्या, आम्ही प्रपंच म्हातारं झाल्यावर करायचा का?” असंही सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.