IPL 2024, RCB vs SRH : विराटचा आयपीएलमध्ये अनोखा विक्रम. पण, धिम्या फलंदाजीमुळे टीका 

IPL 2024, RCB vs SRH : विराटने हैद्राबाद विरुद्ध ४३ चेंडूंत ५१ धावा केल्या 

114
IPL 2024, Virat Kohli : विराट कोहली फिरकीला खेळताना खरंच अडखळतोय का?
IPL 2024, Virat Kohli : विराट कोहली फिरकीला खेळताना खरंच अडखळतोय का?
  • ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (IPL 2024, RCB vs SRH) आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) या आयपीएलमध्ये सातत्याने धावा करतोय. हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने एक अनोखा विक्रम केला आहे. ५१ धावांच्या खेळीमुळे त्याने हंगामात ४०० धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी त्याने तब्बल १० वेगवेगळ्या हंगामात केली आहे. हा एक विक्रम आहे. यापूर्वी डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांनी ९ हंगामांमध्ये ४०० चा टप्पा पार केला आहे. (IPL 2024, RCB vs SRH)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील वाशिम येथील प्रकार ; मतदार यादीत नावे गहाळ!)

विराटसाठी आयपीएलचा सगळ्यात भन्नाट हंगाम होता तो २०१६ चा. यात त्याने ४ शतकं आणि ७ अर्धशतकांसह ९७३ धावा जमवल्या होत्या. एका हंगामातील सर्वाधिक धावांचा हा विक्रम आजही अबाधित आहे. विराट बरोबरच जास्तीत जास्त हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज बघूया,  (IPL 2024, RCB vs SRH)

विराट कोहली (१० हंगाम) – २०११, २०१३, २०१५, २०१६, २०१८, २०१९, २०२०, २०२१, २०२३, २०२४

सुरेश रैना (९ हंगाम) – २००८, २००९, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१७, २०१८

शिखर धवन (९ हंगाम) – २०११, २०१२, २०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२१, २०२२, २०२३

डेव्हिड वॉर्नर (९ हंगाम) – २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२२, २०२३

रोहित शर्मा (७ हंगाम) – २००८, २०१०, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९

विराटने आपल्या आयपीएल कारकीर्दीत २४६ सामन्यांत एकूण ७,६९३ धावा केल्या असून ८ शतकं ठोकली आहेत. हे जरी असलं तरी यंदाच्या हंगामात त्याच्यावर धिम्या फलंदाजीसाठी टीका होतेय. सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोहलीने ४३ चेंडूंत ५१ धावा केल्या. आयपीएल सारख्या वेगवान प्रकारात ही फलंदाजी अवसान घातकी असल्याचं मत आता माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनीही व्यक्त केलं आहे. यापूर्वी विराटवर  टीका झाली तेव्हा गावसकर त्याच्या बाजूने होते. पण, या खेळीनंतर त्यांनीही धोक्याचा इशारा दिला आहे. (IPL 2024, RCB vs SRH)

(हेही वाचा- IPL 2024 RCB vs SRH : ६ पराभवांनंतर अखेर बंगळुरूची पराभवाची मालिका खंडित)

‘अचानक कोहलीने बचावात्मक पवित्रा घेतला. शेवटच्या ३०-३५ धावांसाठी त्याने चौकारही ठोकला नाही. तुम्हाला पहिल्या षटकापासून फलंदाजी मिळाली असेल. तुम्ही १४ षटकं टिकत असाल तर ११८ धावांचा स्ट्राईकरेट टी-२० प्रकाराला साजेसा नाही. तुमच्या संघाला तुमच्याकडून अधिकची अपेक्षा आहे,’ असं परखडपणे गावसकर यांनी बोलून दाखवलं. (IPL 2024, RCB vs SRH)

विराटनंतर फलंदाजीला आलेल्या पाटिदारने २० चेंडूंत ५० धावा केल्या. विराट (Virat Kohli) या कालावधीत पाटिदारला स्ट्राईक देत होता. (IPL 2024, RCB vs SRH)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.