Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील वाशिम येथील प्रकार ; मतदार यादीत नावे गहाळ!

लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करणाऱ्या मतदारांकरिता निवडणूक विभागाने ‘ऑनलाईन लिंक’ जारी केली आहे.

100
Lok Sabha Election 2024 : यूट्यूब व्हिडिओंवर भर, प्रचार झालाय आधुनिक

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडला. यामध्ये २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर मतदान झाले. दरम्यान, शुक्रवार २२ एप्रिल रोजी देशातील १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ लोकसभा जागांवर राज्यात दुसऱ्या टप्प्यातील (Election Phase 2) मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील वाशिम (Washim) येथे मतदान केंद्रावर अनेकांची नावच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे मतदारांकडून नाराजीचा सुर उमटत आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – EVM-VVPAT Case: ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश, जाणून घ्या…)

लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करणाऱ्या मतदारांकरिता निवडणूक विभागाने ‘ऑनलाईन लिंक’ (Online Link) जारी केली आहे. त्याद्वारे मतदान केंद्र माहित करून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, ऑनलाईन पद्धतीने दर्शविण्यात आलेल्या ठराविक केंद्रांमधील मतदार यादीत अनेकांची नावेच नसल्याचा प्रकार वाशिम येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतील मतदान केंद्रावर घडला. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lata Deenanath Mangeshkar Award: अभिनेता रणदीप हुड्डाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार देऊन सन्मान, कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाला… )

मतदानाच्या जनजागृतीसाठी सरकार विविध स्तरावर उपक्रम राबवत होते. यामध्ये निवडणूक विभागाकडून (Election Department) मतदारांच्या सोयीसाठी ‘इलेक्टोरलसर्च डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन’ ही लिंक देण्यात आली आहे. ती अनेकांसाठी अत्यंत लाभदायी ठरली आहे. मात्र काही मतदारांच्या बाबतीत ऑनलाईन दर्शविण्यात आलेल्या केंद्रांमधील मतदार यादीत यासंबंधितांची नावे नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली.  (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.