EVM-VVPAT Case: ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश, जाणून घ्या…

निकाल जाहीर झाल्यानंतर अभियंत्यांच्या टीमद्वारे ईव्हीएमएसचा मायक्रो कंट्रोलर प्रोग्राम तपासण्यासाठी उमेदवारांना पर्याय उपलब्ध असेल, असेही देखील न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटले आहे.

112
EVM-VVPAT Case: ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश, जाणून घ्या...

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (EVM) मतांची त्यांच्या व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT)स्लिप्ससह १०० टक्के पडताळणी करण्याच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत तसेच सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील नवीन निर्देशदेखील निवडणूक आयोगाला दिले आहेत. या पूर्वी न्यायालयाने दोन वेळा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याचिका संदर्भातील निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर शुक्रवार (२६ एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी या सदंर्भातील सर्व याचिका फेटाळल्या आहेत तसेच सर्वोच्च न्यायालयाने बॅलेट पेपर मतदानाकडे परत जाण्याची याचिकाही फेटाळली आहे. (EVM-VVPAT case)

सर्वोच्च न्यायालयाकडून महत्त्वाचे निर्देश…
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चिन्ह लोडिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सिम्बॉल लोडिंग युनिट (SLU) सील केले जावे आणि ते किमान ४५ दिवस साठवले जावे तसेच सिम्बॉल लोडिंग युनिट्सही सील आणि सुरक्षित ठेवाव्यात, असे असे महत्त्वाचे निर्देशदेखील दिले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर अभियंत्यांच्या टीमद्वारे ईव्हीएमएसचा मायक्रो कंट्रोलर प्रोग्राम तपासण्यासाठी उमेदवारांना पर्याय उपलब्ध असेल, असेही देखील न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटले आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: हिंगोलीत मतदानादरम्यान अनेक अडथळे, ३९ बॅलेट मशीन तर १६ कंट्रोल युनिट बदलले)

आम्‍ही निवडणुकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही
यापूर्वी EVM-VVPAT पडताळणी संदर्भात बुधवार, २४ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी व्होटर-व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) स्लिपसह ईव्हीएमद्वारे टाकलेल्या प्रत्येक मताची मोजणी करण्याची मागणी करणार्‍या याचिकांवर सर्वोच्‍च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. आम्‍ही निवडणुकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने आजच्‍या सुनावणीवेळी नोंदवले. लोकसभा निवडणूक 2024 चा दुसरा टप्पा 26 एप्रिलला पार पडत आहे, दरम्यान हा निकाल आला आहे. (EVM-VVPAT case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.