D. Gukesh : ‘विश्वनाथन आनंद यांच्या मदतीशिवाय इथपर्यंत पोहोचलोच नसतो,’ – गुकेश 

D. Gukesh : गुकेशने कँडिडेट्स चषकातील आपल्या कामगिरीचं श्रेय विश्वनाथन आनंदला दिलं आहे 

94
D. Gukesh : ‘विश्वनाथन आनंद यांच्या मदतीशिवाय इथपर्यंत पोहोचलोच नसतो,’ - गुकेश 
D. Gukesh : ‘विश्वनाथन आनंद यांच्या मदतीशिवाय इथपर्यंत पोहोचलोच नसतो,’ - गुकेश 
  •  ऋजुता लुकतुके

सतराव्या वर्षी कँडिडेट्स चषक ही बुद्धिबळातील प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकणाऱ्या डी गुकेशने (D. Gukesh) आपल्या विजयाचं श्रेय भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला (Viswanathan Anand) दिलं आहे. ‘ते नसते तर आता आहे, तिथपर्यंत पोहोचलोच नसतो,’ असं चेन्नईत पोहोचल्या पोहोचल्या त्याने पत्रकारांना बोलून दाखवलं. याचं कारण, गुकेश चेन्नईतल्या वेस्टब्रिज – आनंद बुद्धिबळ अकादमीचा विद्यार्थी आहे. इथं त्याने आनंदच्या हाताखाली बुद्धिबळातल्या डावपेचांबरोबरच मानसिक कणखऱतेचे धडेही गिरवले आहेत.  (D. Gukesh)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: हिंगोलीत मतदानादरम्यान अनेक अडथळे, ३९ बॅलेट मशीन तर १६ कंट्रोल युनिट बदलले)

‘विशीसर माझ्यासाठी प्रेरणादायी तर आहेतच. शिवाय त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं आहे. मी त्यांचा ऋणी आहे. आता जिथे पोहोचलो आहे त्याच्या जवळही मला जाता आलं नसतं, जर विशीसरांनी सर्वतोपरी मदत केली नसती,’ असं गुकेशने बोलून दाखवलं. विशेष म्हणजे गुकेशच्या आधी विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) यांनी कँडिडेट्स चषक स्पर्धा जिंकली होती. म्हणजे भारतात ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्याचा मान फक्त या गुरु – शिष्याच्या जोडीने पटकावला आहे. (D. Gukesh)

इथून पुढे आता गुकेश जगज्जेता डिंग लिरेन बरोबरच्या लढतीची तयारी करणार आहे. पण, हे आव्हान सोपं नसेल याची गुकेशला कल्पना आहे. ‘माध्याकडून अचानक अपेक्षा वाढतील. डावपेचां इतकीच मला मानसिक कणखऱतेची गरज पडेल. हे आव्हान सोपं नाही,’ असं गुकेश प्रांजळपणे म्हणाला.  (D. Gukesh)

(हेही वाचा- D.Gukesh : नवीन कँडिडेट्स चषक विजेत्या गुकेशचं चेन्नईत जोरदार स्वागत )

विशेष म्हणजे जगज्जेतेपदाची लढत भारतातच व्हावी यासाठी भारतीय बुद्धिबळ संघटना प्रयत्न करत आहे. इतर खेळांमध्ये गुकेश क्रिकेट आणि टेनिस पाहणं पसंत करतो. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni), नोवाक जोकोविच (Novak Djokovic) हे त्याचे आदर्श आहेत. ‘कठीण परिस्थिती चांगली कामगिरी करण्याची या खेळाडूंची हातोटी मला आवडते. मलाही बुद्धिबळाच्या पटावर अशीच कामगिरी करायची आहे,’ असं त्याने बोलून दाखवलं. (D. Gukesh)

कँडिडेट्स चषकाच्या तयारीमुळे आतापर्यंत तो आयपीएल पाहू शकलेला नाही. पण, आता तो त्याचा लाडका संघ चेन्नई सुपरकिंग्जला (Chennai Super Kings) सपोर्ट करणार आहे. (D. Gukesh)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.