IPL 2024 RCB vs SRH : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अजोड कामगिरी

IPL 2024 RCB vs SRH : आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा बंगळुरू हा फक्त दुसरा संघ ठरला आहे. 

200
IPL 2024 RCB vs SRH : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अजोड कामगिरी
  • ऋजुता लुकतुके

गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संघ सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा फ्रँचाईजीच्या नावावर एक अजोड विक्रम लागला. कारण, फ्रँचाईजीचा हा २५० वा सामना होता आणि लीगच्या इतिहासात हा मापदंड सर करणारा बंगळुरू हा फक्त दुसरा संघ आहे. मुंबई संघ आतापर्यंत २५५ सामने खेळला आहे. आणि त्यानंतर अशी कामगिरी फक्त बंगळुरू फ्रँचाईजीने केली आहे. (IPL 2024 RCB vs SRH)

आतापर्यंत खेळलेल्या २५० सामन्यांत बंगळुरूने ११८ जिंकल्या आहेत. तर १२८ सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली आहे. ४ सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. म्हणजेच बंगळुरूची यशाची टक्केवारी ही ४६.१८ टक्के इतकी आहे. (IPL 2024 RCB vs SRH)

(हेही वाचा – IPL 2024, RCB vs SRH : विराटचा आयपीएलमध्ये अनोखा विक्रम. पण, धिम्या फलंदाजीमुळे टीका )

बंगळुरूकडून याने केल्या सर्वाधिक धावा

बंगळुरू संघाने आतापर्यंत आयपीएल चषक जिंकलेला नसला तरी तीनदा ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. २००९, २०११ आणि २०१६ ही ती वर्षं आहेत. यातील २०१६ च्या हंगामात त्यांचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) भलत्याच फॉर्मात होता. आणि त्याने ४ शतकं आणि ६ अर्धशतकांसह ९७३ धावा केल्या होत्या. २००९ च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या हंगामात अंतिम सामन्यात डेक्कन चार्जर्स संघाने त्यांचा ६ धावांनी पराभव केला. तर २००९ मध्ये चेन्नई सुपरकिंग्जनी ५८ धावांनी आणि २०१६ मध्ये हैद्राबाद संघाने त्यांना ८ धावांनी हरवलं. (IPL 2024 RCB vs SRH)

अंतिम फेरीत पोहोचण्या खेरिज आणखी पाच वेळा संघ बाद फेरीत पोहोचला होता. २०१०, २०१५, २०२०, २०२१ आणि २०२२ या हंगामांत संघाला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. बंगळुरूकडून सर्वाधिक धावा विराट कोहलीने केल्या आहेत. त्याच्या खात्यात आयपीएलमध्ये ७,६९३ धावा जमा आहेत. यात त्याने विक्रमी ८ शतकं, ५२ अर्धशतकं ठोकली आहेत. त्याचा स्ट्राईकरेट १३० इतका आहे. तर गोलंदाजीत यजुवेंद्र चहल सगळ्यात यशस्वी ठरलाय आणि त्याने ११३ सामन्यांत १३९ बळी मिळवले आहेत. चहल २०१४ ते २०२१ या कालावधीत बंगळुरूकडून खेळला. (IPL 2024 RCB vs SRH)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.