महापालिकेने नव्याने बनवलेल्या पदपथांची ‘जिओ’ लावतेय वाट

214
महापालिकेने नव्याने बनवलेल्या पदपथांची ‘जिओ’ लावतेय वाट
महापालिकेने नव्याने बनवलेल्या पदपथांची ‘जिओ’ लावतेय वाट

मुंबई महापालिकेच्यावतीने सुशोभिकरणांतर्गत रस्त्यांच्या पदपथांची सुधारणा केली जात आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पदपथांच्या सुधारणेसाठी महापालिका प्रयत्नशीर असताना दुसरीकडे सुस्थितीत नव्याने बनवलेल्या पदपथांची पुन्हा वाट लावण्याचे काम जिओ कंपनीच्या माध्यमातून होत आहे. मुंबईत सध्या जिओ कंपनीच्या माध्यमातून केबलचे जाळे पसरवण्यासाठी पदपथांवर खोदकाम केले जात आहे, परंतु यामध्ये काही महिन्यांपूर्वी बनवलेल्या पदपथांवर खोदकाम केले जात आहे. त्यामुळे महापालिकेने पदपथांची सुधारणा करायची आणि जिओ ने खोदकाम करून त्या पदपथांची तोडफोड करायची असाच प्रकार मुंबईत सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

(हेही वाचा – Genesh Idol : पर्यावरणपूरक गणेश मूर्तींसाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार; मूर्ती बनवण्यासाठी शाडू माती उपलब्ध करून देणार)

मुंबईत सध्या पदपथांवर मोठ्याप्रमाणात खोदकाम सुरू असून अनेक ठिकाणी चालण्यास सुस्थितीत असलेल्या पदपथांवरच खोदकाम केले जात आहे. दादरमधील एन.सी. केळकर मार्गावरील पदपथावर खोदकाम करणाऱ्या जिओ कंपनीच्या माध्यमातून दादर रानडे मार्गावरील पेठे ज्वेलर्सच्या समोरील पदपथाचे खोदकाम केले आहे. विशेष म्हणजे या पदपथाचे काम एक वर्षांपूर्वीच करण्यात आले होते. परंतु हेच पदपथ खोदण्यात आले आहे. मुंबईत अशाप्रकारे विविध भागांमध्ये सुस्थितीत असलेल्या पदपथांचे खोदकाम करण्यात येत असून कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या पदपथांची दुरावस्था करून टाकली आहे.

जिओ कंपनीच्या खोदकामानंतर पदपथांची सुधारणा करण्यात येत असली तरी चर खणलेल्या जागेची पुन्हा डागडुजी करताना त्याठिकाणी असमतलपणा निर्माण होत आहे. त्यामुळे पदपथांची डागडुजी करूनही त्यावरून चालताना नागरिकांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.