Dhananjay Munde: २०१७ मध्ये दिल्लीत कोणाच्या घरी बैठक झाली होती? धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

115
Dhananjay Munde: २०१७ मध्ये दिल्लीत कोणाच्या घरी बैठक झाली होती? धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
Dhananjay Munde: २०१७ मध्ये दिल्लीत कोणाच्या घरी बैठक झाली होती? धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर (Dhananjay Munde) येथे राष्ट्रवादी युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी थेट शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. शरद पवार यांनी १९७८ साली महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद सरकार स्थापन केले होते, त्याला संस्कार म्हणायचे आणि आता अजितदादांनी वेगळं जाऊन जे केलं त्याला गद्दारी म्हटले जाते. पण शरद पवार (Sharad Pawar) यांनीच २०१७ मध्ये शिवसेनेला (Shivsena) एकटं पाडण्यासाठी दिल्लीत कोणाच्या घरी आणि कधी बैठक घेतली होती, याचा सर्व तपशील माझ्याकडे पुराव्यासहित उपलब्ध असल्याचे वक्तव्य आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलं आहे.

(हेही वाचा- Manipur: कुकी कट्टरवाद्यांचा मणिपूरमध्ये CRPF बटालियनवर हल्ला, देशाचे दोन सुपुत्र हुतात्मा)

काय म्हणाले धनंजय मुंडे ?

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, “राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पुलोद सरकार स्थापन करायची वेळ का आली? त्याला संस्कार म्हणायचे. मात्र, आता अजितदादांनी जे केलं आहे, ते त्यांनी एकट्याने केलेलं नाही, आमच्यासारख्या असंख्य जणांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. पण २०१४ मध्ये बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय हा संस्काराचा भाग आणि आता अजितदादांनी केलं त्याला गद्दारी म्हणायचे. २०१७ मध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी कुठे आणि कधी बैठक झाली, याचे व्हीडिओसहित फुटेज माझ्याकडे आहे. ही बैठक दिल्लीत कोणाच्या घरी झाली? याचा तपशील मी सांगू शकतो. या बैठकीत शिवसेनेला कसं बाजूला काढायचं, यावर चर्चा झाली. याच्यासहित जे काय घडलं होतं, त्याला संस्कार म्हणायचे आणि आम्ही केलं त्याला गद्दारी म्हणायची.” असे सांगत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Dhananjay Munde)

(हेही वाचा- वयाच्या ९०व्या वर्षीही भूमिका साकारणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री Zohra Sehgal)

जाणता राजाने कुटुंब का निवडलं?

“जाणत्या राजाला घर नसते. पोरं नसतात, बाळ नसतं, संबंध कुटुंब त्याचं घर असतं. रयत त्याचं घर असतं. मग रयत आणि कुटुंबापैकी एकाची निवड करायची वेळ आली तेव्हा जाणता राजाने कुटुंब का निवडलं?” असा सवालही धनजंय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. (Dhananjay Munde)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.