“मी दक्षिण भारतीय असून मी भारतीय दिसते”, Nirmala Sitharaman यांचं सॅम पित्रोदा यांना प्रत्युत्तर

67
"मी दक्षिण भारतीय असून मी भारतीय दिसते", Nirmala Sitharaman यांचं सॅम पित्रोदा यांना प्रत्युत्तर

इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. एका मुलाखतीत पित्रोदा यांनी भारताच्या वेगवेगळ्या भागातले लोक कसे दिसतात? याची परदेशी लोकांबरोबर तुलना केली. “भारत विविधतेने भरलेला देश आहे, जिथे पूर्वेकडचे लोक चिनी लोकांसारखे वाटतात. पश्चिमेकडचे लोक अरबी वाटतात. उत्तरेकडचे लोक थोडे युरोपियन्ससारखे वाटतात. दक्षिणेकडचे लोक आफ्रिकीसारखे दिसतात.” असं सॅम पित्रोदा म्हणाले. त्यांच्या या विधानाला आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

मी दक्षिण भारतीय असून मी भारतीय दिसते

निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) म्हणाल्या, “मी दक्षिण भारतीय असून मी भारतीय दिसते. माझ्या टीममध्ये ईशान्य भारतातील उत्साही सदस्य आहेत. तेही भारतीय दिसतात. पश्चिम भारतातील माझे सहकारीही भारतीय दिसतात. पण राहुल गांधींचे वर्णद्वेषी सल्लागार यांच्यामते आम्ही अफ्रिकन, चिनी, अरब आणि गोरे आहोत. तुमची विचारसरणी आणि प्रवृत्ती दर्शवल्याबद्दल धन्यवाद.” अशी टीका निर्मला सीतारमण यांनी केली. (Nirmala Sitharaman)

काँग्रेसचा अशा उपमा आणि वक्तव्यांशी कोणताही संबंध नाही

सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसवर टीका होत असताना यावर आता काँग्रेसने आपली भुमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी पित्रोदा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणारी एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, ‘सॅम पित्रोदा यांनी एका पॉडकास्टमध्ये भारतातलं वैविध्य सांगताना ज्या प्रकारची तुलना केलीय ते दुर्दैवी आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अशा उपमा आणि वक्तव्यांशी कोणताही संबंध नाही.’ असं ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.