Kuno National Park : गांधीसागरच्या अभयारण्यात ५ ते ८ नवे चित्ते येणार 

गांधीसागर अभयारण्य हे ३६८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. त्यातील ६४ चौरस किलोमीटर क्षेत्र कुंपण घालून सुरक्षित करण्यात आले आहे. या सुरक्षित क्षेत्रात दक्षिण आफ्रिकेतून आणले जाणारे चित्ते सुरुवातीला सोडण्यात येणार आहेत.

103
Kuno National Park : गांधीसागरच्या अभयारण्यात ५ ते ८ नवे चित्ते येणार  

भारतातील मध्यप्रदेशात कुनो येथील नॅशनल पार्क येथे, दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया (Namibia South Africa) येथून आठ चित्ते (cheetahs) आणले गेले होते. त्या नंतर या पाहुण्याचे भारतभर स्वागत केले गेले. या वर्षाच्या अखेरीस आणखी ५ ते ८ चित्ते भारतात दाखल होणार आहेत. या नव्या पाहुण्याना कुनो नॅशनल पार्कपासून सहा तासाच्या अंतरावर असेलल्या गांधीसागर अभयारण्यात (Gandhisagar Sanctuary) ६४ किमीच्या परिसरात चित्त्यांसाठी नवा अधिवास प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. (Kuno National Park) 

(हेही वाचा – Heat Stroke: नागरिकांनो काळजी घ्या! तीन दिवस उष्णतेची लाट)

सप्टेंबरच्या २०२२ मध्ये नामिबिया येथून आठ चित्त्यांची पहिली तुकडी भारतात आणली गेली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्त्यांची दुसरी तुकडी भारतात आणली गेली. सध्या कुनोतील चित्त्यांची संख्या ही २६ झाली आहे. त्यामुळे कुणोचे क्षेत्र या चित्त्यांसाठी कमी पडण्याची शक्यता असून गांधीसागर येथे नवा अधिवास तयार करण्यात येत आहे. (Kuno National Park)

(हेही वाचा – Manipur: कुकी कट्टरवाद्यांचा मणिपूरमध्ये CRPF बटालियनवर हल्ला, देशाचे दोन सुपुत्र हुतात्मा)

दरम्यान, कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांचा आढावा घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे शिष्टमंडळ (Delegation of South Africa) भारतात आले होते. यावेळी त्यांनी गांधीसागर अभयारण्यला भेट देऊन पाहणी केली. यानंतर या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. संबंधित चित्ता प्रकल्प मजबूत करण्यासाठी सरकारकडून भर देण्यात येत आहे. (Kuno National Park)   

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.