Lok Sabha Election 2024 : निवडणुकीत काँग्रेसला आठवली अयोध्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्येतील रोड शोनंतर आता इंडी आघाडीही आपले फासे टाकण्याच्या तयारीत आहे.

72
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीत काँग्रेसला आठवली अयोध्या

अयोध्येतील श्री राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस (Congress) पक्षाला लोकसभा निवडणूकीसाठी अयोध्यामध्ये जावे लागत आहे. राम मंदिरात दर्शन करण्यासाठी गेले म्हणून काँग्रेस पक्षाने पक्षातील काही नेत्यांना वाईट वागणूक दिली असल्याचा आरोप पक्षातील अनेक नेत्यांनी केला आहे. मात्र आता राहुल गांधी स्वतः पक्ष प्रचारासाठी अयोध्येमध्ये जाणार असल्याचे समजते. यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अयोध्या आठवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Lok Sabha Election 2024)

खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अयोध्येतील रोड शोनंतर आता इंडी आघाडीही आपले फासे टाकण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी राहुल-अखिलेश यांची जाहीर सभा आणि प्रियांका-डिंपल आणि इकरा हसन यांचा रोड शो करण्याची तयारी केली जात आहे. त्याचवेळी मित्रसेनच्या बालेकिल्ल्यात शिवपाल यादव यांची जाहीर सभा घेऊन यादव मते वाचवण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. (Lok Sabha Election 2024)

रविवारी सुग्रीव किल्ला ते लता मंगेशकर चौक असा रोड शो करून पंतप्रधान मोदींनी मोठा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांची दिशा ठरवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांच्या या राजकीय वाटचालीच्या संभाव्य नफा-तोट्याचेही विरोधी पक्ष मूल्यांकन करत आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Sam Pitroda यांचा नवा सेल्फ गोल… वर्णवादी वक्तव्य; यापूर्वी पुलवामा हल्ला, राम मंदिर आणि भारतातील मध्यमवर्गीयांचा केला हाेता अपमान)

यादव मतांवर लक्ष

सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी एकत्र प्रचारसभा घेण्याची तयारी करत आहेत. येथील निम्म्या लोकसंख्येची मते मिळवण्यासाठीही जोरदार योजना आखण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि सपा खासदार डिंपल यादव यांच्या रोड शोची तयारी सुरू आहे. सपाने स्टार प्रचारक इकरा हसनलाही बोलावण्याची योजना आखली आहे. (Lok Sabha Election 2024)

तसेच शक्तिशाली नेते मित्रसेन यादव गांचा बालेकिला असलेल्या समा मिल्कीपूर भागात त्यांचा मुलगा नेते माजी आयपीएस अरविंद सेन सीपीआयकडून निवडणूक रिंगणात आहे. दोन दिवसांपूर्वी आनंदसेन बागादव यांनीही नाराजी व्यक्त केली. अशा परिस्थितीत यादव मतांचे विखुरणे टाळण्यासाठी नेते शिवपाल यादव यांची सभा आहे. यासाठी मागणीही पाठवली असून, त्यावर लवकरच निर्णय होऊ शकतो. सपाचे जिल्हाध्यक्ष पारसनाथ यादव यांनी सांगितले की, यादी तयार करून जाहीर सभा आणि रोड शोसाठी मागणी पाठवली आहे. ९ ते १८ मे दरम्यान सर्व कार्यक्रम होणे अपेक्षित असून त्याची तयारीही सुरू झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.