आदित्य ठाकरेंचं डिपॉजिट जप्त नाही केलं तर मी मिशा ठेवणार नाही: Gunaratna Sadavarte

154
आदित्य ठाकरेंचं डिपॉजिट जप्त नाही केलं तर मी मिशा ठेवणार नाही: Gunaratna Sadavarte
आदित्य ठाकरेंचं डिपॉजिट जप्त नाही केलं तर मी मिशा ठेवणार नाही: Gunaratna Sadavarte

राज्याच्या सहकार खात्याने अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचं एसटी बँकेचं संचालकपद रद्द केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. येणाऱ्या विधानसभेमध्ये मी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना चॅलेंज देतो, येणाऱ्या वरळी विधानसभेमध्ये त्यांनी डिपॉजिट जप्त करून दाखवावं. आदित्य ठाकरेंचं डिपॉजिट जप्त नाही केलं तर मी मिशा ठेवणार नाही. असं आव्हान सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) दिलं आहे.

(हेही वाचा –Sam Pitroda: भारताच्या पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात, सॅम पित्रोदा यांनी पुन्हा केले वादग्रस्त विधान)

अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) म्हणाले की, “तुम्ही वीर जिजामाता नगरमध्ये येऊन पाहा. सदावर्तेच्या मागे किती शक्ती आहे. उद्धव ठाकरेंच्यामागे एकही माणून दिसणार नाही. वरळीमध्ये अंतर्गत खूप काम सुरू आहे. आदित्यच्या पायाखालची वाळू सरकली आहे. वरळीतून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढून दाखवावी. पहिल्या 25 टक्के मतमोजणीतच आदित्य ठाकरे रडत रडत घरी जातील. त्यांचं डिपॉजिट जप्त करणार.” असं ते म्हणाले. (Gunaratna Sadavarte)

(हेही वाचा –PM Narendra Modi: सॅम पित्रोदांच्या वक्तव्याचा पंतप्रधान मोदींनी घेतला समाचार, म्हणाले…)

संचालकपद रद्द केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) म्हणाले की, “आमचं संचालक पद रद्द केलेलं नाही. सर्व बातम्या खोट्या असून त्या बातमीचा निषेध करतो. तक्रारदार संदीप शिंदे हे शरद पवारांच्या ताटाखालचं मांजर आहेत. बॅंकेवर सामान्य कष्टकरी निवडून आणल्यानंतर शरद पवारांना जळजळ होतेय, सोबतच त्यांच्या आजूबाजूच्यांना आग लागली आहे. आमचं संचालक पद रद्द केलेलं नाही , यासंदर्भात प्रोसिडिंग देखील झालेली नाही. या बातमीचा निषेध करतो.” असं त्यांनी सांगितलं. (Gunaratna Sadavarte)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.