Sam Pitroda यांचा नवा सेल्फ गोल… वर्णवादी वक्तव्य; यापूर्वी पुलवामा हल्ला, राम मंदिर आणि भारतातील मध्यमवर्गीयांचा केला हाेता अपमान

'द स्टेट्समन' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारतातील विविधतेत एकतेवर सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त विधान केले.

88

काँग्रेसचे नेते आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) कायम विवादास्पद वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात, नुकतेच त्यांनी अमेरिकेतील वारसा कराराचा भारतातही विचार झाला पाहिजे असे वक्तव्य केले होते. ज्यामुळे राजकीय पातळीवर काँग्रेसवर टीकेची झोड उठली होती. हा धुराळा शांत होत नाही तोच पित्रोदा यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले, ज्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. भारताच्या विविधतेबद्दल विधान केले. पित्रोदा म्हणाले की, भारतात पूर्वेकडील लोक चिनी आणि दक्षिणेकडील लोक आफ्रिकन दिसतात. ‘द स्टेट्समन’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारतातील विविधतेतील एकतेवर वादग्रस्त विधान केले.

(Sam Pitroda) काय म्हणाले पित्रोदा? 

आम्ही 75 वर्षे अतिशय आनंदी वातावरणात राहिलो. लोक इकडचे तिकडचे वाद बाजूला ठेवून एकत्र राहिले. भारतासारख्या विविधतेने नटलेला देश आपण एकत्र ठेवू शकतो. जेथे पूर्वेकडील लोक चिनी, पश्चिमेकडील अरबी, उत्तरेचे गोरे आणि दक्षिणेकडील आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. इथे आपण सगळे भाऊ-बहिणी आहोत. आम्ही सर्व वेगवेगळ्या भाषा, धर्म, चालीरीती आणि खाद्यपदार्थांचा आदर करतो. माझा विश्वास असलेला हा भारत आहे, जिथे प्रत्येकासाठी जागा आहे. इथे प्रत्येकजण एकमेकांसाठी थोडी तडजोड करतो.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मला खूप राग आला आहे. लोकांनी मला शिवी दिली तर मी शिवीगाळ सहन करतो. पण शहजाद्याच्या फिलॉसॉफर व्यक्तीने एवढी शिवी दिली की माझे मन संतापाने भरले आहे. माझ्या देशातील लोकांची गुणवत्ता त्यांच्या त्वचेच्या रंगावरून ठरवली जाईल का? कातडीच्या रंगाचा खेळ खेळण्याचा अधिकार शहजाद्याला कोणी दिला? संविधान डोक्यावर घेऊन नाचणारे लोक माझ्या देशाचा अपमान करत आहेत.

(हेही वाचा BMC Roads : आचारसंहितेमुळे लटकले रस्ते कंत्राट, खड्ड्यांची जबाबदारी पडणार महापालिकेच्याच माथी?)

काँग्रेसचा सावध पवित्रा 

यावर काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश सोशल मीडियावर म्हणाले, भारताच्या विविधतेबद्दल सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी दिलेली उपमा चुकीची आणि अस्वीकार्य आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यापासून पूर्णपणे अलिप्त आहे.

पित्रोदांनी याआधी कोणकोणती वादग्रस्त विधाने केली? 

23 एप्रिल रोजी सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी अमेरिकेप्रमाणे भारतातही वारसा कर लागू करण्याबाबत बोलले होते. अमेरिकेत जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा सरकार त्याच्या मालमत्तेपैकी 55% घेते, तर त्याच्या मुलांना फक्त 45% मिळते. भारतात असा कोणताही कायदा नसल्याचेही पित्रोदा म्हणाले. अशा विषयांवर वाद-विवाद व्हायला हवेत. हा धोरणात्मक मुद्दा असून संपत्तीचे वितरण चांगले होईल, असे धोरण काँग्रेस पक्ष बनवेल, असे ते म्हणाले.

भाजपने राजीव गांधींना 1984च्या शीखविरोधी दंगलीचे सूत्रधार म्हटले होते. यावर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे निकटवर्तीय असताना पित्रोदा 10 मे 2019 रोजी म्हणाले होते की, आता 1984 चे काय? भाजपने 5 वर्षांत काय केले यावर बोलूया. 84 असे झाले, तुम्ही काय केले? या विधानापासून काँग्रेसला दूर राहावे लागले आणि पित्रोदा (Sam Pitroda) यांना माफी मागावी लागली.

पित्रोदा (Sam Pitroda) यांनी 6 एप्रिल 2019 रोजी म्हटले होते की, मध्यमवर्गाने स्वार्थी बनू नये. त्यांनी अधिक कर भरण्याची तयारी केली पाहिजे. या विधानानंतर काँग्रेस पक्षाला धक्का बसला.

(हेही वाचा Supreme Court: कोणतीही जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी स्वघोषणा पत्र जारी करावं, सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश)

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. यावर प्रश्न उपस्थित करत 22 मार्च 2019 रोजी पित्रोदा म्हणाले की, असे हल्ले होतच असतात. काही दहशतवाद्यांनी हल्ला केला, याची शिक्षा संपूर्ण पाकिस्तानला का? मुंबईतही हल्ला झाला आणि आमचे सरकारही प्रत्युत्तर देऊ शकते, असे पित्रोदा (Sam Pitroda) म्हणाले होते. आम्ही आमची विमानेही पाठवू शकलो असतो, पण हा दृष्टिकोन योग्य नाही.

6 जून 2018 रोजी राम मंदिरावर पित्रोदा (Sam Pitroda) म्हणाले होते की, भारतातील बेरोजगारी, महागाई आणि शिक्षण यासारख्या समस्यांवर कोणीही बोलत नाही. प्रत्येकजण राम, हनुमान आणि मंदिराबद्दल बोलतो. मंदिर बांधून रोजगार मिळणार नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.