Raghav Chaddha : प्रियंका चोप्राने राघव चड्ढाला वाचविले?

221
Raghav Chaddha : प्रियंका चोप्राने राघव चड्ढाला वाचविले?
Raghav Chaddha : प्रियंका चोप्राने राघव चड्ढाला वाचविले?
  • वंदना बर्वे 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष भीषण संकटात सापडला असताना खासदार राघव चड्ढा (Raghav Chaddha) कुठेही दिसत नाही आहेत. संकटाच्या या घडीत केजरीवाल आणि पक्षाच्या बाजूने लढण्याऐवजी चड्ढा मैदान सोडून लंडनमध्ये आनंदात आहेत.
आपचे बहुतांश नेते तुरुंगात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. आम आदमी पक्ष दिल्लीतील चार आणि पंजाबमधील सर्व 13 जागा लढविणार आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचनालयाने अटक केली आहे. खासदार संजय सिंग, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, डॉ. सत्येद्र जैन आधीपासूनच तुरुंगात आहेत.
अशा बिकट काळात पक्षाचा किल्ला लढवायचे सोडून आपचे राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा (Raghav Chaddha) लंडनमध्ये जाऊन बसले आहेत. त्यांच्याकडे पंजाबचा प्रभार सुद्धा आहे, हे येथे उल्लेखनीय.
आपच्या भानगडीत पडायचेच नाही?
मुळात, केजरीवाल यांना अटक झाल्यानंतरही चड्ढा भारतात का आले नाहीत? हा सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना पक्षाच्या भानगडीत पडायचेच नाही? की त्यांना कुणीतरी भारतात येण्यास मनाई केली आहे? हाही प्रश्न निर्माण झाला आहे.
राघव चड्ढा यांना डोळ्याचा त्रास 
राघव चड्ढा (Raghav Chaddha) यांना डोळ्याचा त्रास असल्याचे सांगितलं जात आहे. ते “रेटिना डिटेचमेन्ट प्रॉब्लेम”ची समस्या आहे. यामुळे ऑपेरेशन साठी आठ मार्च रोजीच ते लंडनला गेलेत. मात्र, ते अन्य कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यामुळे शंका आणखी बळावली आहे.
मात्र “हिंदुस्थान पोस्ट”ला जी माहिती मिळाली आहे ती वेगळीच आहे. राघव चड्ढा (Raghav Chaddha) यांनी चित्रपट अभिनेत्री परिनिता चोप्रा यांच्याशी लग्न केले आहे. परिनीतीची मोठी बहीण म्हणजे दिग्गज अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) यांची भारतातील राजकारण आणि बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये चांगली ओळख आहे. विशेषतः आयकर विभाग, सीबीआय, ईडी, या विभागातील अधिकाऱ्यांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे.
आप नेते रडारवार 
यामुळे मद्य घोटाळा प्रकरणी ईडी कुणाकुणावर कारवाई करणार आहे? आपचे कोणते नेते रडारवार आहेत? याची माहिती प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) यांनीओळखीचा वापर करून मिळविली आहे.
प्रियंका चोप्रा संकटमोचक 
प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) यांना सूत्रकडून असे कळले की, केजरीवाल यांच्यानंतर पुढचा नंबर राघव चड्ढा (Raghav Chaddha) यांचा आहे. हे ऐकल्यानंतर चोप्रा यांच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या बहिणीचे नुकतेच लग्न झाले आहे. अशात राघव चड्ढा (Raghav Chaddha) यांना अटक झाली तर परिणीतिला खूप त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) यांनी परिनीतीला राघव चड्ढा (Raghav Chaddha) भारतात गेले तर त्यांना अटक झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितलं.
प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) यांनीच राघव चड्ढा (Raghav Chaddha) यांची समजूत काढली आणि भारतात न जाण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हे तर, लंडनमधूनही उलट सुलट विधान न करण्यास सांगितले. म्हणून राघव चढढा लंडनमधेच थांबले आहेत.
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.