स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सादर करीत आहे #SelfieWithSavarkar स्पर्धा…

सावरकर या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. आता सगळीकडे सावरकरमय वातावरण झाले आहे. सावरकरांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रणदीप हुड्डा यांनी खूप कष्ट घेतले आहेत.

123

रणदीप हुड्डा यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पहा, सेल्फी घ्या आणि जिंका…स्वातंत्र्य वीर सावरकर या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. चित्रपटाने 10 कोटींचा टप्पा पार केला आहे. लवकरच या चित्रपटावर ‘हिट’चा शिक्का बसेल. सगळीकडे सावरकर चित्रपटाची चर्चा होत असताना दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने तरुणाईला साद घालणारा अत्यंत उपयुक्त उपक्रम सुरू केला आहे. स्मारकाने #SelfieWithSavarkar स्पर्धेचे आयोजन केले आहे.

काय आहे स्पर्धा आणि कुठे पाठवाल सेल्फी?

रणदीप हुड्डा यांचा स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट पाहायला गेल्यावर चित्रपटाच्या पोस्टरसह आपला सेल्फी घ्या आणि #SelfieWithSavarkar hashtag लिहून स्वतःच्या फेसबुक वॉलवर पोस्ट करा आणि महत्त्वाचे म्हणजे https://www.facebook.com/SavarkarSmarakच्या Facebook पेजवर या स्पर्धेच्या पोस्टरखाली  #SelfieWithSavarkar hashtag देऊन सेल्फी कमेंट करा.

(हेही वाचा Veer Savarkar Premiere Show: ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटामुळे क्रांतिकारकांच्या स्मृतिंना उजाळा मिळेल – रणदीप हुड्डा)

सावरकर या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. आता सगळीकडे सावरकरमय वातावरण झाले आहे. सावरकरांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रणदीप हुड्डा यांनी खूप कष्ट घेतले आहेत. आजचे यंगस्टर्स आपली प्रत्येक गोष्ट सेल्फीद्वारे व्यक्त करतात. सेल्फी हा तरुणाईच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. त्यामुळे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सावरकर स्मारकाने सेल्फी विथ सावरकर स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.