Dr. Sadanand Date : राष्ट्रीय तपास संस्थेची धुरा मराठी माणसाच्या खांद्यावर

डॉ. सदानंद दाते यांची एनआयए प्रमुखपदी नियुक्ती

176
NIA : राष्ट्रीय तपास संस्थेची धुरा मराठी माणसाच्या खांद्यावर

जेष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. सदानंद दाते (Dr. Sadanand Date) यांची राष्ट्रीय तपास संस्था (NIA) च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डॉ. सदानंद दाते यांची स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळख आहे. दाते हे सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख आहेत. (Dr. Sadanand Date)

डॉ. सदानंद दाते (Dr. Sadanand Date) यांनी मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात कामा रुग्णालयात दहशतवाद्यांशी सामना करून अनेकांचे प्राण वाचवले होते. दाते यांना शौर्यसाठी राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आले होते. (Dr. Sadanand Date)

(हेही वाचा – World Cup Qualifier : अफगाणिस्तानकडून भारताचा धक्कादायक पराभव)

सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या दाते यांनी २०२० मध्ये नव्याने स्थापन झालेल्या मीरा भाईंदर वसई विरार (MBVV) पोलीस आयुक्तालयाचे पहिले आयुक्तपद भूषवले. पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था आणि नंतर मुंबई शहरातील गुन्हे शाखेचे सह आयुक्तपद भूषवले आहे. दाते (Dr. Sadanand Date) यांनी त्याच्या मूळ गावी, पुणे युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेट मिळवली आहे. (Dr. Sadanand Date)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.