World Cup Qualifier : अफगाणिस्तानकडून भारताचा धक्कादायक पराभव 

World Cup Qualifier : भारतीय कर्णधार सुनील छेत्रीचा हा १५० वा आंतरराष्ट्रीय सामना होता 

121
World Cup Qualifier : अफगाणिस्तानकडून भारताचा धक्कादायक पराभव 
World Cup Qualifier : अफगाणिस्तानकडून भारताचा धक्कादायक पराभव 
  • ऋजुता लुकतुके

गुवाहाटीतील इंदिरा गांधी ॲथलेटिक्स स्टेडिअममध्ये भारतीय कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) आपला १५० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार होता. त्यामुळे सुरुवातीलाच भारतीय फुटबॉल फेडरेशनकडून एक खास फोटो-फ्रेम देऊन त्याचा गौरव केला. त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्धचा सामना सुरू झाला तेव्हा छेत्री होताही जोशात. त्यानेच ३७ व्या मिनिटाला पेनल्टीवर सुरेख गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. (World Cup Qualifier)

(हेही वाचा- Virat Kohli : विराट कोहलीने जेव्हा घरच्यांना मैदानातून व्हीडिओ कॉल केला )

इथपर्यंत भारतीय संघासाठी सगळं सुरळीत होतं. आणि गेल्या सामन्यात हुकलेला विजय भारतीय संघ मिळवेल, अशीच सगळ्यांना अपेक्षा होती. पण, फिफा क्रमवारीत भारताच्याही खाली असलेल्या आणि त्यातही आपला दुसऱ्या फळीचा संघ या दौऱ्यावर पाठवलेल्या अफगाणिस्तान संघाचा इरादा काही वेगळा होता. (World Cup Qualifier)

पहिल्या सामन्यात त्यांचाही खेळ चांगला झाला होता. गोल करण्याची चुणूक त्यांनी दाखवून दिली होती. त्यामुळे अफगाण संघाचे होसलेही बुलंद होते. तेच नंतरच्या खेळात दिसून आले. (World Cup Qualifier)

(हेही वाचा- Prakash Ambedkar : वंचितची पहिली उमेदवार यादी; मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी?)

रेहमत अकबरीने (Rehmat Akbari) ७१ व्या मिनिटाला त्यांना बरोबरी साधून दिली. ८८ व्या मिनिटाला शरिफ मुखम्मदने (Sharif Muhammad) पेनल्टीवर गोल करून भारताला चक्का पराभवाचा धक्का दिला. (World Cup Qualifier)

या पराभवामुळे भारताचा आशिया चषक २०२७ (Asia Cup 2027) साठी पात्र ठरण्याच्या मनसुब्यांवरही पाणी फिरलं आहे. तर फिफा पात्रता फेरीतही आशिया स्तरावरच भारताचा पराभव आता अटळ आहे. अफगाणिस्तानने १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर भारताच्या गुरप्रीत सिंगला येलो कार्ड मिळालं. भारतीय संघ १० जणांसह खेळत असल्यामुळे अफगाण संघाला आक्रमकतेला वाव मिळाला. (World Cup Qualifier)

(हेही वाचा- Cash Seized : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर स्कॉर्पिओ गाडीत सापडली 50 लाखांची रोकड)

सुनील छेत्रीचा (Sunil Chhetri) मात्र १५० व्या सामन्यातील हा ९४ वा गोल होता. पहिल्या हाफमध्ये भारतीय संघाचंच सामन्यावर वर्चस्व होतं. पण, ती पकड भारताला मजबूत करता आली नाही. एकसंधतेचा अभाव हे भारतीय पराभवाचं मुख्य कारण ठरलं. अफगाणिस्तान बरोबर यापूर्वी २२ मार्चला सौदी अरेबियात झालेला सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. (World Cup Qualifier)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.