India Power Shortage : जून महिन्यात भारतात जाणवणार १४ वर्षातील सगळ्यात मोठा वीज तुटवडा

India Power Shortage : जून महिन्यात तब्बल १४ गिगावॅटचा तुटवडा जाणवू शकतो

83
India Power Shortage : जून महिन्यात भारतात जाणवणार १४ वर्षातील सगळ्यात मोठा वीज तुटवडा
India Power Shortage : जून महिन्यात भारतात जाणवणार १४ वर्षातील सगळ्यात मोठा वीज तुटवडा
  • ऋजुता लुकतुके

गेल्यावर्षी संबंध भारतात नियमित मान्सूनपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. आणि त्याचा परिणाम पुढील महिन्यात वीजेचा भयानक तुटवडा जाणवण्यात होणार आहे. जून महिन्यात वीजेची मागणी सगळ्यात जास्त असताना तब्बल १४ गिगावॅटचा तुटवडा देशभरात जाणवू शकतो. केंद्रसरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सनी ही बातमी दिली आहे. आता केंद्रसरकारचा प्रयत्न आहे तो सुरू असलेल्या वीज प्रकल्पांची देखभाल पुढे ढकलून वीज निर्मिती सुरू ठेवण्याचा. तसंच बंद असलेले प्रकल्प सुरू करण्यावरही विचार सुरू आहे. (India Power Shortage)

(हेही वाचा- Sanju Samson Wicket : संजू सॅमसनच्या झेलाविषयी अधिक माहिती सांगणारा नवा व्हीडिओ समोर)

गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जलविद्युत केंद्रांमध्ये पाण्याचा साठा कमी आहे. त्यामुळे वीज निर्मिती कमी झाली आहे. तसंच केंद्राकडून ३.६ गिगावॅट्स क्षमतेच्या नवीन कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पांना वेळेवर परवानगी मिळाली नाही, हे कारणही समोर येत आहे. परवानगी अभावी हे प्रकल्प सुरू होऊ शकले नाहीत. आणि आता तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. २००९-१० च्या जून महिन्यानंतर पहिल्यांदा वीजेची मागणी आणि पुरवठा यांच्यात इतकी मोठी तफावत निर्माण झाली आहे. (India Power Shortage)

केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग (RK Singh) यांनी अलीकडेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आणि वीज निर्मिती प्रकल्प अव्याहत सुरू ठेवण्याचे निर्देश विभागांना दिले आहेत. कसंच देशातील अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत (urja strot) आणि सौरऊर्जा (saururja) यांच्या उपलब्धतेचा आढावाही घेण्यात आला आहे. (India Power Shortage)

(हेही वाचा- ManiShankar Iyer: पाकिस्तानकडे अणुबॉम्ब, भारताने आदर करावा; काँग्रेसच्या वक्तव्याने एकच खळबळ)

देशातील ऊर्जा ग्रिड प्रशासक मंडलाने जून महिन्यात रात्रीच्या वेळी वीजेची मागणी २३५ गिगावॅट असेल असा अंदाज वर्तवला आहे. आणि देशात औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून १८७ गिगावॅट आणि इतर अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पातून ३४ गिगावॅट इतकीच वीज उपलब्ध होणार आहे. (India Power Shortage)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.