Virat Kohli : विराट कोहलीने जेव्हा घरच्यांना मैदानातून व्हीडिओ कॉल केला 

Virat Kohli : विराट कोहली दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला आहे 

155
Virat Kohli : विराट कोहलीने जेव्हा घरच्यांना मैदानातून व्हीडिओ कॉल केला 
Virat Kohli : विराट कोहलीने जेव्हा घरच्यांना मैदानातून व्हीडिओ कॉल केला 
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलमध्ये (IPL) परतलाय तो दोन महिन्यांच्या क्रिकेट विश्रांतीनंतर. विराट आपल्या मुलाच्या जन्मासाठी पितृत्वाच्या रजेवर होता. पुनरागमनानंतर दुसऱ्याच सामन्यात त्याने पंजाब (Punjab) विरुद्ध ४९ चेंडूंत ७७ धावांची खेळी साकारली. ११ चौकार आणि २ षटकारांनी सजलेल्या त्याच्या खेळीनंतर त्याला सामनावीराचा किताबही मिळाला. (Virat Kohli)

(हेही वाचा- Cash Seized : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर स्कॉर्पिओ गाडीत सापडली 50 लाखांची रोकड)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या विजयानंतर विराट कोहली (Virat Kohli) मैदानावरच आपल्या कुटुंबीयांशी बोलताना दिसला. तो व्हीडिओ कॉलवर होता. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता. तो वारंवार फोनवर फ्लाईंग किसही देत होता. विराट लहान मुलाशी बोलावं तसं फोनवर बोलताना दिसला.  (Virat Kohli)

(हेही वाचा- Munawar Farooqui : समाज सेवा शाखेची हुक्का पार्लरवर कारवाई; वादग्रस्त कॉमेडियन मुनावर फारुकी नशा करताना सापडला, )

‘मला कल्पना आहे की, माझं नाव अलीकडे फक्त टी-२० क्रिकेटचा जगभरात प्रसार करण्यासाठी घेतलं आणि वापरलं जातं. पण, मी टी-२० खेळूही शकतो,’ असं दोन मुलांचा बाप असलेला ३५ वर्षीय विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यानंतर मीडियाशी बोलताना म्हणाला. आयपीएलनंतर जून महिन्यात टी-२० क्रिकेट विश्वचषक (T20 World Cup) होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ कसा असावा याची चर्चा करताना ३५ च्या वरील खेळाडूंना संघात स्थान असावं का याची चर्चा होते. त्यात विराट कोहलीच्या संघ समावेशावर काही वेळा प्रश्नचिन्हही उभं केलं जातं. त्याला उत्तर म्हणून कोहलीने हे विधान केलं हे उघड आहे. (Virat Kohli)

(हेही वाचा- IPL 2024 : बंगळुरू संघाच्या पहिल्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये असा झाला जल्लोष )

तुम्ही तुमची खेळी कशी साकारणा याची रणनीती तुमच्याकडे तयार पाहिजे आणि तुमच्या खेळात सकारात्मक बदल करण्याची तुमची तयारी पाहिजे, असं विराटने यशाचं गमक सांगताना म्हटलं. (Virat Kohli)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.