IPL 2024 : बंगळुरू संघाच्या पहिल्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये असा झाला जल्लोष 

IPL 2024 : बंगळुरू संघाने हंगामातील पहिल्या विजयानंतरचा एक व्हीडिओ ‘ड्रेसिंग रुम स्पेशल’ नावाने प्रसिद्ध केला आहे

98
IPL 2024 : बंगळुरू संघाच्या पहिल्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये असा झाला जल्लोष 
IPL 2024 : बंगळुरू संघाच्या पहिल्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये असा झाला जल्लोष 
  • ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने या हंगामातील आपला पहिला विजय पंजाब किंग्ज संघाविरुद्ध सोमवारी नोंदवला. विराट आणि दिनेश कार्तिकच्या खेळींमुळे बंगळुरूने शिखर धवनच्या पंजाब संघाचा ४ गडी राखून पराभव केला. त्यानंतर चिन्नास्वामीच्या ड्रेसिंग रुममध्ये एकच जल्लोष झाला. बंगळुरू फ्रँचाईजीने (RCB) हा व्हीडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘बंगळुरू वि पंजाब, ड्रेसिंग रुम स्पेशल,’ असा मथळाच त्यांनी या व्हीडिओला दिला आहे. (IPL 2024)

(हेही वाचा- Munawar Farooqui : समाज सेवा शाखेची हुक्का पार्लरवर कारवाई; वादग्रस्त कॉमेडियन मुनावर फारुकी नशा करताना सापडला, )

यात खेळाडूंनी केलेला जल्लोष, मोठ्याने फोडलेल्या डरकाळ्या, संघ सहकाऱ्यांची भाषणं आणि संघाचं गाणं अशी सगळी धमाल आहे. (IPL 2024)

विराट कोहलीच्या (Virat Kohli) ५९ चेंडूंत ७७ धावा आणि दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) सातव्या क्रमांकावर येऊन १० चेंडूंत केलेल्या २७ धावा यामुळे बंगळुरूने हा विजय साध्य केला. विराटने आपल्या खेळीत २ षटकार आणि ११ चौकार लगावले होते. ‘डीकेनं केलेला शेवट, विराटचा मास्टरक्लास, महिपालचा इम्पॅक्ट, सिराजने पाळलेलं वचन आणि यशचं सातत्य, या सगळ्याचा परिपाक म्हणजे बंगळुरूने मिळवलेला विजय, असं या संदेशात म्हटलं आहे. आपण हा व्हीडिओ पाहूया, (IPL 2024)

(हेही वाचा- Road महापालिकेच्या निधीतून बनले संजय गांधी उद्यानातील रस्ते)

बंगळुरूने नाणेफेक जिंकून पंजाबला पहिल्या फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) झटपट दोन गडी बाद करत पंजाबच्या फलंदाजीला खिळ घातली. पण, शिखऱ धवनच्या ४५ धावा आणि मधल्या फळीचं सातत्यपूर्ण योगदान यांच्या जोरावर पंजाबने सहा बाद १७६ धावा केल्या. (IPL 2024)

(हेही वाचा- Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; तासभर चर्चा)

या धावसंख्येला उत्तर देताना विराट कोहलीने (Virat Kohli) टी-२० प्रकारातील १०० वं अर्धशतक झळकावलं. तर शेवटच्या षटकांमध्ये ३ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी करत दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) कठीण वाटणारा विजय मिळवून दिला. (IPL 2024)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.