Akola News: काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

151
Akola News: काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Akola News: काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

दिवसेंदिवस (Akola News) उन्हाच्या झळा (Heat Wave) वाढतानाच दिसत आहेत. उन्हापासुन दिलासा मिळावा यासाठी घरोघरी एसी, कुलरचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मात्र, ही उपकरणे वापरताना काळजी घेणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अकोल्यात कुलरचा वापर एका 7 वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतला आहे. कुलरचा शॉक लागून एका 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. कुलरमधील एक तार तुटून त्यात विद्यूत प्रवाह वाहू लागला. खेळता खेळता चिमुकलीचा हात कुलरला लागला आणि तिला जोरदार धक्का बसला. दरम्यान तिला रुग्णालयात दाखल केलं असता त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. (Akola News)

भाजप नगरसेवक अमोल गोगे यांची मुलगी

मृत मुलीचं नाव युक्ती गोगे असून ती भाजप नगरसेवक अमोल गोगे (Amol Goge) यांची मुलगी आहे. ही घटना अकोला शहरातील असून परिसरात शोककळा पसरली आहे. रविवारी (५ मे) रात्री 9 च्या सुमारास कुलर जवळ खेळत असताना ही घटना घडली आहे. कुलरमधील एक तार तुटला आणि हा तार कुलरच्या जाळीला लागला त्यामुळे कुलरच्या जाळीत विद्युत प्रवाह वाहू लागला. खेळता खेळता या चिमुकलीचा हाथ कुलरला लागला आणि तिला जोरदार धक्का बसला. घरच्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी युक्तीला दवाखान्यात दाखल केलं, मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. (Akola News)

कुलर वापरताना काय काळजी घ्यावी ?

1. कुलरची आणि घराची वायरिंग तपासून घेणे
2. लहान मुलांचा कुलरला स्पर्श होणार नाही याची दक्षता घेणे
3. कुलरमध्ये पाणी भरतांना कुलरमधील विद्युत प्रवाह बंद करणे

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.