South Mumbai LS Constituency : बाहेर फेकलेल्या मुंबईकरांना हे सरकार परत आणणार; मुख्यमंत्र्यांचा शब्द

199
South Mumbai LS Constituency : बाहेर फेकलेल्या मुंबईकरांना हे सरकार परत आणणार; मुख्यमंत्र्यांचा शब्द

रखडलेले प्रकल्प, कोणामुळे अडकलेले प्रकल्प मार्गी लावून मुंबईबाहेर फेकलेल्या मुंबईकरांना हे सरकार परत आणणार आहे. त्यासाठी बीडीडी प्रकल्प, पोलिसांची घरे म्हाडा (MHADA), एमएमआरडीए, एमएसआरडीसी (MSRDC), एमआयडीसीच्या (MIDC) माध्यमातून पुनर्विकासाचे प्रकल्प सुरु करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शनिवारी दक्षिण मुंबईतील प्रचार रॅली च्या समारोप सभेत बोलतांना दिले. मुंबईसाठी इतके वर्ष काय केले, याचा हिशेब मुंबईकर येत्या निवडणुकीत विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. ज्या उपक्रमातून मुंबईकरांना लाभ होत असेल तर हा मुख्यमंत्री ते करायला तयार आहे, असे ते म्हणाले. (South Mumbai LS Constituency)

दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यभरात पहिल्या चार टप्प्यात महायुतीला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) व्यक्त केला. (South Mumbai LS Constituency)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: मुंबईसह १३ मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; २० मे रोजी होणार मतदान)

दोन अडीच वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही

आपले सरकार येण्यापूर्वी सगळी कामे बंद होती. मेट्रो कारशेड(metro carshed), अटल सेतू (Atal Setu), समृद्धी महामार्ग, मुंबईचे सौंदर्यीकरण असे अनेक प्रकल्प महायुतीने सुरु केले. दोन अडीच वर्षात मुंबईतील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वी रस्त्यावर केवळ डांबर टाकायचे आणि त्यात पैसे खायचे. यासाठी महापालिकेचे दहा वर्षात साडेतीन हजार कोटी रुपये खर्च झाले होते. पुढील २५-३० वर्षात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, अशीही मुख्यमंत्री यांनी गॅरंटी दिली. (South Mumbai LS Constituency)

पुनर्विकास रखडलेल्या ३८८ इमारतींसाठी वेगळा नियम

बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी हिंदूत्व सोडले. आता तर त्यांना शिवरायांचा भगवा झेंडा, प्रभू रामचंद्राचा भगवा आणि वारकऱ्यांच्या भगव्या झेंड्याची अ‍ॅलर्जी झालीय कारण तुमच्या प्रचार रॅलींमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत आहेत, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. तसेच पुनर्विकास रखडलेल्या ३८८ इमारतींसाठी नगर विकास विभागाला वेगळा नियम करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. (South Mumbai LS Constituency)

मागील १० वर्षात देशाला जगभरात मानसन्मान

ही निवडणूक देश घडवणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मागील १० वर्षात देशाला जगभरात मानसन्मान मिळवून दिला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. यासाठी यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना निवडून द्यायचे आहे. आपल्या सरकारमध्ये भेदभाव नाही. हिंदू असो वा देशभक्त मुसलमान सर्वांना समान वागणूक दिली जाते. मात्र उबाठाच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकतात. त्यांच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा फिरतो. याकूब मेनन (Yakub Menon) यांच्या कबरीचे उदात्तीकरण होतेय. मुंबई हल्ल्यातील हुतात्मा पोलिसांचा अपमान केला, अशा ढोंगी लोकांना निवडणुकीत जागा दाखवा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. (South Mumbai LS Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.