मुंबईला अतिरेक्यांच्या ताब्यात देण्याचा Uddhav Thackeray यांचा प्लॅन; दिपक केसरकर यांची घणाघाती टीका

168
मागील २५ वर्ष मुंबई मनपात सत्तेत असताना मुंबईकरांसाठी काही करता आले नाही. केवळ मतांसाठी मराठी माणूस म्हणणाऱ्या उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निवडणुकीत तडजोड करुन पाकिस्तानवादी अतिरेक्यांच्या ताब्यात मुंबई द्यायची आहे, असा थेट व गंभीर आरोप मुंबईचे पालकमंत्री व राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी शनिवारी बाळासाहेब भवन या पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला. केवळ सहानुभूतीवर न जाता वस्तुस्थिती पाहून मुंबईकरांनी डोळसपणे मतदान करावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
आज झालेल्या इंडिया आघाडीची पत्रकार परिषद आणि कालच्या प्रचारसभेत मुंबईचा विषय आला नाही. परंतू मुंबईच्या दृष्टीने ही महत्वाची निवडणूक असताना इंडिया आघाडीला मुंबईचे वावडे का, असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला. मुंबईसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्टांविरोधात लढा दिला आणि ज्या ठिकाणी कम्युनिस्ट असतात तिथे गुंतवणूक येत नाहीत. मात्र महाराष्ट्रातून गुंतवणूक बाहेर गेली, असे म्हणणाऱ्या ठाकरे गटाच्या प्रचारसभेत कम्युनिस्ट पक्षाचे लाल झेंडे दिसतात, हा मोठा विरोधाभास असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेबांनी पाकिस्तानवादी शक्तींच्या विरोधात लढा दिला होता. ज्यावेळी भारत-पाकिस्तान मॅच व्हायची तेव्हा मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजवले जायचे. मात्र ते बाळासाहेबांनी मुंबईतून हद्दपार केले. परंतू तुमच्या प्रचारात बॉम्बस्फोटातील आरोपी फिरत आहेत. बाळासाहेबांमुळे मुंबई सुरक्षित होती. मात्र आता निवडणुकीपुरता तडजोड कराल तर मुंबईकरांच्या हिताला मुकाल, असा गंभीर इशाराही केसरकर यांनी ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला.
मुंबादेवी, महालक्ष्मी आणि सिद्धीविनायक या तीन महत्वाच्या देवस्थांनासाठी मुंबई महापालिकेत २५ वर्ष सत्तेत असताना ठाकरे यांनी काय केले, असा सवाल त्यांनी केला. मुंबईतील हवेत सुधारणा, पायाभूत सेवा प्रकल्प, हॉस्पिटलचा कायापालट, कॉंक्रिटचे रस्ते,कोळीवाड्यांचा विकास, वरळीमध्ये जेट्टी याबाबत सत्तेत असताना निर्णय का घेऊ शकले नाहीत, यावर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुंबईकर जनतेला उत्तर द्यायला हवे, असे विचारत हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो याऐवजी देशभक्त असे बोलणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी मुंबईबाबत विचारलेल्या प्रश्नांवर गुळमुळीत उत्तरे देऊन मतदारांची दिशाभूल करु नये, असाही सल्ला केसकर यांनी दिला.
महायुतीचे हिंदुत्व हे नोकऱ्या देणारे आहे. मात्र मुंबईतील नोकऱ्यांबाबत आदित्य ठाकरे यांनी काय केले. मुंबईची सिस्टर सिटी जर्मनीमधील स्टुटगार्ट शहर आहे. मात्र तेथे मराठी तरुणांना नोकऱ्या का दिल्या नाहीत, याचेही उत्तर ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी द्यायला हवे. यासंदर्भात महायुती सरकारने निर्णय घेऊन चार लाख तरुणांना नोकरीचे करारपत्र सुपूर्द केले.जर्मनीतील सहा शहरांमध्ये मराठी तरुणांसाठी नोकरी आणि फॅमिली व्हीजा देण्याचा करार करण्यात आला.

प. महाराष्ट्र महायुतीच्या पाठीशी…..

पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश लोक मुंबई, नवी मुंबई परिसरात कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. प.महाराष्ट्रात मागील दोन वर्षात महायुती सरकारकडून विकास कामे झाली आहेत. त्यामुळे मुंबईतील सहाही जागांच्या विजयांमध्ये प.महाराष्ट्रातील जनतेचा मोठा वाटा असेल, असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.