Cash Seized : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर स्कॉर्पिओ गाडीत सापडली 50 लाखांची रोकड

Cash Seized : मंगळवारी उर्से टोलनाका येथे शिरगाव पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका स्कॉर्पिओमध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम मिळाली.

224
Cash Seized : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर स्कॉर्पिओ गाडीत सापडली 50 लाखांची रोकड
Cash Seized : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर स्कॉर्पिओ गाडीत सापडली 50 लाखांची रोकड

पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका स्कॉर्पिओमध्ये 50 लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नसल्याने रोकड जप्त करण्यात आली आहे. (Cash Seized)

(हेही वाचा – Munawar Farooqui : समाज सेवा शाखेची हुक्का पार्लरवर कारवाई; वादग्रस्त कॉमेडियन मुनावर फारुकी नशा करताना सापडला, )

नऊ ठिकाणी नाकाबंदी

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) अनुषंगाने पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिसांनी हद्दीमध्ये नऊ ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) उर्से टोलनाका येथे देखील नाकाबंदी करण्यात आली आहे. मंगळवारी उर्से टोलनाका येथे शिरगाव पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका स्कॉर्पिओमध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम मिळाली.

पोलिसांनी संबंधित चालकाकडे रकमेबाबत खुलासा मागितला. मात्र त्यास योग्य खुलासा करता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याचेही पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले. (Cash Seized)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.