Republic Party : रिपब्लिकन पक्षाची पुण्यात राज्यस्तरीय बैठक; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार

Republic Party : रिपब्लिकन पक्षाच्या या महत्वपुर्ण बैठकीस रिपाइंचे राज्यातील केंद्रिय पदाधिकारी आणि राज्यकार्यकारिणीचे प्रमूख पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

86
Republic Party : रिपब्लिकन पक्षाची पुण्यात राज्यस्तरीय बैठक; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार
Republic Party : रिपब्लिकन पक्षाची पुण्यात राज्यस्तरीय बैठक; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक येत्या गुरुवारी 28 मार्चला सकाळी 11 वाजता पुणे येथील द लेडीज क्लब, तारापोरे जवळ; कॅम्प पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. (Republic Party)
रिपब्लिकन पक्षाच्या (Republic Party) या महत्त्वपूर्ण बैठकीस रिपाइंचे राज्यातील केंद्रीय पदाधिकारी आणि राज्य कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathavle) प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाने (Republic Party) आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय बैठकीकडे सर्व राजकीय धुरिणांचे, राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत रिपाइं (आठवले) कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Republic Party)

(हेही वाचा- IPL 2024 CSK vs GT : चेन्नईच्या हंगामात पहिल्यांदा २०० धावा, गुजरातचा केला ६३ धावांनी पराभव)

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली असून राज्यात महायुतीचा (Mahayuti) घटक पक्ष असताना ही रिपब्लिकन पक्षाकडे (Republic Party) जागावाटपात महायुतीकडुन (Mahayuti) दुर्लक्ष झालेले आहे. त्यात भर म्हणून रिपब्लिकन पक्षाने (Republic Party) केलेल्या विरोधाला न जुमानता भाजपाने मनसेला सोबत घेण्याचा आटापिटा केला आहे. राज्यभरात अनेक जिल्हात रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना समाज माध्यमांवर व्यक्त केल्या आहेत.रिपब्लिकन कार्यकर्त्यांची भावनिकता ओळखून रामदास आठवले (Ramdas Aathavle) यांनी तातडीने गुरुवार, 28 मार्च रोजी रिपब्लिकन पक्षाच्या (Republic Party) राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) महायुतीच्या (Mahayuti) जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाचा वाटा किती, तसेच महायुतीत मनसेला वाटा दिल्यास रिपब्लिकन पक्षाने (Republic Party) कोणती वाट धरायची आणि कोणाची वाट लावायची यावर रिपाइंच्या राज्यस्तरीय बैठकीत विचार विनिमय होणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात रिपाइं काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे रिपाइंच्या राज्यस्तरीय बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Republic Party)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.