T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय जर्सीचं अनावरण एका अनोख्या ढंगात

भारतीय जर्सी पुन्हा एकदा आदिदास कंपनीने पुरस्कृत केली आहे

124
T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय जर्सीचं अनावरण एका अनोख्या ढंगात
T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय जर्सीचं अनावरण एका अनोख्या ढंगात
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल स्पर्धेची रंगत आता कुठे सुरू झाली आहे, तोच सगळ्यांना आगामी टी-२० विश्वचषकाचे (T20 World Cup 2024) वारेही जाणवू लागले आहेत. भारताने आपला पंधरा जणांचा संघ काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. आता सोमवारी भारतीय संघाच्या जर्सीचं अनावरण अनोख्या ढंगात करण्यात आलं. निळ्या आणि भगव्या रंगातील ही जर्सी हेलिकॉप्टरमधून हिमाचलप्रदेशच्या धरमशाला मैदानात उतरली. आणि तिचं स्वागत करण्यासाठी मैदानावर कर्णधार रोहित शर्मा, (Rohit Sharma) अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आणि फिरकीपटू कुलदीप यादव हजर होते. असा हा व्हीडिओ बीसीसीआयने जारी केला आहे.

तर आपल्या इन्स्टाग्रामवरील व्हीडिओत आदिदास या जर्सीच्या प्रायोजक संघानेही एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. ‘एक जर्सी, एक देश. देशाची नवीन टी-२० जर्सी संघाच्या सेवेत हजर आहे,’ असं या व्हीडिओबरोबरच्या संदेशात कंपनीने म्हटलं आहे.

(हेही वाचा – Police Constable : विषप्रयोग नाही, तर अती मद्यपानामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू?)

बीसीसीआयच्या सोशल मीडियावरही हा व्हीडिओ आहे. रोहित, कुलदीप आणि जाडेजा धरमशाला मैदानावर सराव करत आहेत. आणि अचानक रोहितला (Rohit Sharma) हेलिकॉप्टरमधून महाकाय आकारातील भारतीय जर्सी खाली उतरताना दिसते, असा हा व्हीडिओ आहे. निळ्या आणि भगव्या रंगाच्या या जर्सीवर डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो आहे. आणि ‘व्ही नेक’ गळा असून त्याला राष्ट्रध्वजाची बॉर्डर आहे. (T20 World Cup 2024)

जर्सीच्या बाह्या भगव्या रंगाच्या आहेत. भारतीय संघ साखळीतील चारही सामने अमेरिकेत न्यूयॉर्कच्या रसॉ स्टेडिअमवर खेळणार आहे. संघाचा पहिला सामना ४ जूनला आयर्लंड विरुद्ध होणार आहे. तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धचा सामना ९ जूनला याच मैदानावर होणार आहे. (T20 World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.