Lok Sabha Election 2024: महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

95
Lok Sabha Election 2024: महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवार, (७मे) रोजी होत आहे. यातच दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. (Lok Sabha Election 2024)

यावेळी यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी माध्यमांशी सांगितले की, राजसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला आम्ही इथं आलो होतो. महायुतीमध्ये राजसाहेबसुद्धा आहेत. त्यांच्या शुभेच्या घ्यायला आलो. ते पूर्णपणे आमच्या पाठीशी उभे आहेत. एवढी त्यांनी ग्वाही दिलेली आहे.

शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-मनसे-रिपाई महायुतीच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ. यामिनी यशवंत जाधव यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना उपनेते यशवंत जाधव आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – Police Constable : विषप्रयोग नाही, तर अती मद्यपानामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.