Breast Cancer Awareness : ‘थँक्स अ डॉट’ कार्यक्रमाद्वारे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी जागृती

Breast Cancer Awareness : महिलांनी नियमितपणे घरच्या घरी स्तन-परीक्षा करावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारा उपक्रम एसबीआय लाईफने आयोजित केला होता. 

109
Breast Cancer Awareness : ‘थँक्स अ डॉट’ कार्यक्रमाद्वारे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी जागृती
  • ऋजुता लुकतुके

महिलांनी स्वतःची काळजी घेणे ही रोजची सवय बनावी यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मध्यमवयीन महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढतंय जर त्याची परीक्षा वेळवर होऊ शकली, तर धोका नक्कीच कमी होतो. महिलांनी घरच्या घरी स्तन परीक्षा करून या कर्करोगाबद्दल जागरुक रहावं असा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. (Breast Cancer Awareness)

आता महिलांमध्ये याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी एसबीआय लाईफने थँक्स अ डॉट, हॉट वॉटर बॅग, असा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत महिलांना स्तन परीक्षेच्या मार्गदर्शनाबरोबरच कर्करोगाच्या जागृतीसाठी एक हॉटर वॉटर बॅग भेट म्हणून देण्यात आली. स्तनातील गाठीमुळे वेदना होतात, तेव्हा महिला हॉट-बॅगने शेकणं पसंत करतात. महिलांना या कार्यक्रमात दिलेल्या हॉट वॉटर बॅगमवर कर्करोगातील गाठीचा आकार आणि स्पर्श असलेली गाठ या पिशवीवर एम्बेड करण्यात आली आहे. एसबीआय लाईफ इन्श्युरन्सचे एमडी आणि सीईओ अमित झिंगरन, स्तनाच्या कर्करोगातून बऱ्या झालेल्या अभिनेत्री महिमा चौधरी, सहायक पोलिस आयुक्त महेश मुगुटराव या कार्यक्रमाला उपस्थित होते. (Breast Cancer Awareness)

(हेही वाचा – Raghav Chaddha : प्रियंका चोप्राने राघव चड्ढाला वाचविले?)

अधिकृत आकडेवारी असं सांगते की, स्तनांच्या कर्करोगाच्या ६०% केसेस खूप पुढच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर डॉक्टरांकडे येतात. इतर आजार आणि स्तनांचा कर्करोग यातील एक मोठा फरक म्हणजे कोणतीही महागडी वैद्यकीय साधने न वापरता, घरच्या घरी, स्वतः दर महिन्याला काही सोपी पावले उचलून स्तनांच्या कर्करोगाची तपासणी करता येते, ज्यामुळे हा आजार खूप आधी लक्षात येऊ शकतो. स्तनांच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्याची आणि आजार लवकरात लवकर लक्षात यावा यासाठी जीवन-रक्षक कौशल्ये शिकवून महिलांना सक्षम बनवण्यासाठी एसबीआय लाईफने अतिशय नाविन्यपूर्ण अशी थँक्स अ डॉट हॉट वॉटर बॅग डिझाईन केली. स्वतः स्तनांची तपासणी करण्याचे, आजार लवकरात लवकर लक्षात येण्याचे महत्त्व समजावून देऊन, स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. महिलांनी एक जीवन-रक्षक कौशल्य आत्मसात करावे आणि दररोज आपल्या आरोग्याला प्राधान्य देता यावे यासाठी सवयींमध्ये बदल करावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे. (Breast Cancer Awareness)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.