Karnataka Hijab Ban : कर्नाटकमध्ये हिजाबबंदी मागे घेतलेली नाही; मुख्यमंत्र्यांची सारवासारव

Karnataka Hijab Ban : शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबंदी उठवण्याविषयी सरकारी पातळीवर पुरेशी चर्चा झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

159
Karnataka Hijab Ban : कर्नाटकमध्ये हिजाबबंदी मागे घेतलेली नाही; मुख्यमंत्र्यांची सारवासारव
Karnataka Hijab Ban : कर्नाटकमध्ये हिजाबबंदी मागे घेतलेली नाही; मुख्यमंत्र्यांची सारवासारव

कर्नाटक (Karnataka) राज्यात आम्ही हिजाबबंदी अद्याप मागे घेतलेली नाही. यावर मला प्रश्‍न विचारण्यात येत आहेत. शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबंदी उठवण्याविषयी प्रशासन चाचपणी करत आहे. सरकारी पातळीवर यासंदर्भात पुरेशी चर्चा झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे (Congress Govt) मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी घेतली.

(हेही वाचा – Sakshi Malik : कुस्तीपासून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेणार आहे? यावर साक्षी मलिक म्हणाली…)

२ दिवसांपूर्वी केली होती घोषणा

२ दिवसांपूर्वी सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी शिक्षणसंस्थांमध्ये लागू करण्यात आलेली हिजाबबंदी (hijab ban) मागे घेतल्याची घोषणा केली होती. याला हिंदु संघटनांकडून विरोध झाल्यावर सिद्धरामय्या यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी म्हटले होते, ‘शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालणे, कपड्यांची आणि अन्नाची निवड ही वैयक्तिक असेल.’ त्यामुळे शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबंदी मागे घेतल्याची चर्चा चालू झाली होती.

(हेही वाचा – Jagdeep Dhankhar : मला तुम्हाला लाजवायचे नाही पण…; उपराष्ट्रपती धनखड यांचे मल्लिकार्जुन खर्गेंना चर्चेचे निमंत्रण)

भाजपचे आरोप

वर्ष २०२२ मध्ये तत्कालीन भाजप (BJP GOVT) सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यास बंदी केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयातही गेले होते.

हिजाबबाबतच्या सरकारच्या संभ्रमावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये धर्मनिरपेक्ष वातावरण असण्याची गरज आहे, असे कर्नाटक भाजप अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी म्हटले. (Karnataka Hijab Ban)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.