Madhya Pradesh Politics: मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार Nirmala Sapre यांचा भाजपामध्ये प्रवेश 

काँग्रेस दिलेली आश्वासने पूर्ण करत नाही, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अजेंड्यामुळे प्रभावित होऊन सप्रे यांचा भाजपात प्रवेश

90
Madhya Pradesh Politics: मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार Nirmala Sapre यांचा भाजपामध्ये प्रवेश 

मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Madhya Pradesh Congress) मोठा धक्का बसला आहे. आमदार निर्मला सप्रे (MLA Nirmala Sapre) यांनी मुख्यमंत्री मोहन यादव (CM Mohan Yadav) आणि मंत्री गोविंद सिंग राजपूत (Minister Govind Singh Rajput) यांच्या उपस्थितीत राहतगड येथे भाजपात प्रवेश केला. निर्मला सप्रे (MLA Nirmala Sapre) यांनी दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. पहिल्या निवडणुकीत त्या भाजपच्या महेश राय यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. १० वर्षांनंतर त्यांनी पुन्हा भाजपाचे उमेदवार महेश राय यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. (Madhya Pradesh Politics)

(हेही वाचा – Rajnath Singh : पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी बळाचा वापर करण्याची गरज भासणार नाही; राजनाथ सिंह यांचा विश्वास)

काँग्रेस आमदार निर्मला सप्रे यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या राहतगड येथील सभेत भाजपात प्रवेश केला. निर्मला सप्रे यांनी बीना विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि दोन वेळा आमदार राहिलेले महेश राय यांचा ६००० हून अधिक मतांनी पराभव केला होता. जिल्ह्यातील आठ विधानसभा जागांपैकी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली. त्यात निर्मला सप्रे यांनी भाजपात प्रवेश केला. निर्मला सप्रे या एससी प्रवर्गाचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.  (Madhya Pradesh Politics)

काँग्रेसने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. 

काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलेल्या निर्मला सप्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी विरोधी पक्षात असताना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली जात नाहीत. याशिवाय मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अजेंड्यामुळे प्रभावित होऊन मी भाजपात प्रवेश केला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच माझ्या भाजपामद्धे प्रवेश करण्यामागचे प्रमुख कारण आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी हा निर्णय घेतला आहे. (Madhya Pradesh Politics)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.