Rajnath Singh : पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी बळाचा वापर करण्याची गरज भासणार नाही; राजनाथ सिंह यांचा विश्वास

इस्लामाबादने सीमेपलीकडील दहशतवाद थांबवला पाहिजे. ते भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही ते होऊ देणार नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.

68

जम्मू आणि काश्मीरमध्ये ज्या प्रकारे ग्राउंड परिस्थिती बदलली आहे, ज्या प्रकारे या प्रदेशात आर्थिक प्रगती होत आहे आणि ज्या प्रकारे तेथे शांतता परत आली आहे, मला वाटते की पीओकेच्या लोकांकडूनच भारतात विलीन होण्याच्या मागण्या पुढे येतील, पीओके घेण्यासाठी आम्हाला बळाचा वापर करावा लागणार नाही कारण लोक म्हणतील की आम्हाला भारतात विलीन केले पाहिजे. अशा मागण्या आता येत आहेत. पीओके आमचा होता, आहे आणि राहील, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा Devendra Fadnavis: काँग्रेस अजमल कसाबसारख्या दहशतबाद्यांसोबत आहे, फडणवीसांचा पलटवार)

आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्टची गरज नाही

कलम ३७० रद्द केल्यापासून काश्मीरमधील सुधारलेल्या परिस्थितीचा संरक्षणमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. राजनाथ सिंह म्हणाले की, लवकरच केंद्रशासित प्रदेशात AFSPA (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट) ची गरज भासणार नाही. इस्लामाबादने सीमेपलिकडचा दहशतवाद थांबवला पाहिजे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ज्या प्रकारे परिस्थिती सुधारत आहे, मला वाटते की एक वेळ येईल जेव्हा तेथे AFSPA ची आवश्यकता राहणार नाही. हे माझे मत आहे आणि ते गृह मंत्रालयाने ठरवायचे आहे, असेही राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या प्रॉक्सी युद्धाचा संदर्भ देत संरक्षण मंत्री म्हणाले की इस्लामाबादने सीमेपलीकडील दहशतवाद थांबवला पाहिजे. ते भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही ते होऊ देणार नाही, असे राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.